{जीवन चरित्र} डॉ एपीजे अब्दुल कलाम मराठी माहिती apj abdul kalam information in marathi

Dr abdul kalam information in marathi: स्वतंत्र भारताचे अकरावे राष्ट्रपती व एक महान शास्त्रज्ञ डॉ अवील पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम यांनाच डॉ एपीजे अब्दुल कलाम म्हणूनही ओळखले जाते. आजच्या या लेखात आपण डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची मराठी माहिती मिळवणार आहोत. त्यांच्या बालपणापासून तर भारताच्या वैज्ञानिक क्षेत्रातील योगदाना पर्यंतचा संपूर्ण जीवन परिचय आपण पाहणार आहोत. तर चला सुरू करूया…

डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या विषयी थोडक्यात माहिती

पुर्ण नावडॉक्टर अवुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम.
जन्म15 ऑक्टोंबर 1931
मृत्यू27 जुलै 2015
जन्म स्थानधनुषकोंडी गाव रामेश्वरम् तामिळनाडू.
वडिलांचे नावजैनुलाबदिन कलाम
आईचे नावअशिमा कलाम
धर्मतामिळ मुस्लिम
व्यवसायशास्त्रज्ञ, इंजिनिअर, लेखक
राष्ट्रपती कार्यकाळ2002 – 07


Dr Apj Abdul Kalam Information in Marathi

प्रारंभिक जीवन डॉक्टर कलाम यांचे बालपण

अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोंबर 1931 ला तामिळनाडू राज्यातील रामेश्वरम् शहराच्या धनुष कोंडी या लहानश्या गावात झाला. ते एक तामिळ मुस्लिम कुटुंबात जन्मले होते. त्यांचे पूर्ण नाव अवुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम होते. त्यांचे वडील जैनुलाबदिन हे एक नाविक व सामान्य मत्स्य व्यावसायिक होते. त्यांच्या आईचे नाव आशिमा होते. आशिमा या एक उत्तम गृहिणी होत्या व परमेश्वरात त्यांची खूप आस्था होती.

लहानपणापासूनच घराची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने बालक कलाम यांना आपल्या शिक्षणासाठी घरोघरी जाऊन वृत्तपत्र देण्याचे काम करावे लागले. आपल्या शालेय अभ्यासात अब्दुल कलाम एक सामान्य विद्यार्थी होते. धार्मिक स्वभावाच्या आई व प्रामाणिक वडिलांकडून त्यांना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.

अब्दुल कलाम यांचे शिक्षण

अब्दुल कलाम यांनी आपले प्राथमिक शालेय शिक्षण रामेश्वरम् मधील एलिमेंटरी स्कूल मधून केले. अभ्यासात सामान्य असतांनाही ते खूप मेहनती होते. गणित हा त्यांचा आवडता विषय होता, गणिताच्या अभ्यासात ते तासनतास घालवत असत. त्यांनी श्र्वार्टज हायर सेकंडरी स्कूल मधून पुढील शिक्षण प्राप्त केले. आणि 1950 साली बी एस सी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून अंतरीक्ष विज्ञानात ग्रॅज्युएशन केले. यानंतर सन 1954 मध्ये भौतिक विज्ञानात ग्रॅज्युएशन केले. 1955 साली ते मद्रास गेले. जेथून त्यांनी एरोस्पेस इंजिनिअरिंग केली. 1960 साली त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट मधून आपले शिक्षण पूर्ण केले.

करीयर

शिक्षण पूर्ण केल्यावर अब्दुल कलाम यांचे एकाच स्वप्न होते आणि ते म्हणजे फायटर पायलट बनणे. परंतु नशिबाने त्यांच्यासाठी काहीतरी वेगळाच विचार केला होता. त्यांनी डेहराडून मध्ये एअरफोर्स पायलट साठी इंटरव्ह्यू दिला 25 विद्यार्थ्यांपैकी त्यांचे स्थान 9 वे होते. व एअरफोर्स ला केवळ 8 विद्यार्थ्यांची आवश्यकता होती.

यानंतर अब्दुल कलाम दिल्ली ला येऊन गेले. 1960 साली ते DRDO मध्ये शास्त्रज्ञ म्हणून जुडले. सुरुवातीला त्यांनी लहान हेलिकॉप्टर बनवले.

अंतरिक्ष शोधात भारतीय राष्ट्रीय समितीचे सभासद असल्याने त्यांना भारताचे महान शास्त्रज्ञ जसे विक्रम साराभाई या सारख्या लोकांसोबत काम करण्याची संधि मिळाली. 1969 मध्ये त्यांना इसरो [ISRO] पाठवण्यात आले. तेथे त्यांनी प्रोजेक्ट डायरेक्टर चा कार्यभार सांभाळला.

1980 साली भारतीय शासनाने एक आधुनिक मिसाइल कार्यक्रम (advance missile program) अब्दुल कलाम यांच्या निर्देशनाखाली सुरू केला. या प्रोग्राम चे नाव Integrated Guided missile developement program होते. अब्दुल कलाम यांच्या निर्देशनामुळेच अग्नि मिसाईल, पृथ्वी मिसाईल यांचे यशस्वी परीक्षण झाले.

एक इंजिनिअर व शास्त्रज्ञाच्या रूपाने त्यांनी रक्षा व विकास संघटन (DRDO) आणि भारतीय अंतरिक्ष शोध संघटन (ISRO) साठी अनेक महत्वपूर्ण कार्य पार पाडले.

सन 1998 मध्ये त्यांनी पोखरण च्या द्वितीय परमाणु परीक्षणातही महत्वाची भूमिका बजावली. डॉक्टर कलाम भारताच्या अंतरिक्ष आणि मिसाईल कार्यक्रला ही जुडले. यामुळेच त्यांना ‘मिसाइल मॅन’ म्हटले जाते. त्यांना भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान भारत रत्नानेही सन्मानित केले गेले.

Apj abdul kalam mahiti marathi

भारताचे राष्ट्रपति एपीजे अब्दुल कलाम

2002 साली सत्तारूढ पक्ष राष्ट्रीय जनतांत्रिक गटबंधन (NDA) द्वारे त्यांना देशाच्या राष्ट्रपति पदाचे उम्मीदवार बनवण्यात आले. 18 जुलै 2002 ला एपीजे अब्दुल कलाम यांनी राष्ट्रपति पदाची शपत घेतली. ते स्वतंत्र भारताचे अकरावे राष्ट्रपति होते. अब्दुल कलाम राजनीतीशी जुडले नाहीत परंतु तरीही ते देशाचे राष्ट्रपति बनले. लहानपणापासून जीवनावश्यक गोष्टींची कमी असलेले अब्दुल कलाम कश्या पद्धतीने राष्ट्रपति पदापर्यंत पोहचले हे सर्वांसाठी प्रेरणादायक आहे. आजकाल अनेक युवा अब्दुल कलाम यांना आदर्श मानतात.

अब्दुल कलाम यांना मिळालेले पुरस्कार

1981 भारत शासनाद्वारे पद्म भूषण पुरस्कार मिळाला.
1990 भारत शासनाद्वारे पद्म विभूषण पुरस्कार मिळाला.
1997 भारत शासनाद्वारे भारतरत्न पुरस्कार मिळाला.
1997 राष्ट्रीय एकतेसाठी इंदिरा गांधी पुरस्कार देण्यात आला.
1998 वीर सावरकर पुरस्कार.
2000 मद्रासचे अल्वार रिसर्च सेंटर ने रामानुजम पुरस्कार दिला.
2007 ब्रिटिश रॉयल सोसायटी युके द्वारे किंग चार्ल्स द्वितीय पदकाचा सन्मान.
2007 वॉल्व्हरहॅम्प्टन विद्यापीठ युके कडून डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी
2008 नान्यांग टेक्नॉजिकल युनिव्हर्सिटी, सिंगापूर कडून डॉक्टर ऑफ इंजिनिअरिंग ही पदवी मिळाली.
2009 अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स द्वारे हूवर पदक मिळाले.
2009 अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कडून आंतरराष्ट्रीय von Kármán Wings पुरस्कार.
2010 वॉटरलू विद्यापीठ कडून डॉक्टर ऑफ इंजिनिरिंग ही पदवी मिळाली.
2011 न्यू यॉर्कच्या IEEE (इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्टिकल ॲन्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स) या संस्थेचे समासदत्व

डॉक्टर अब्दुल कलाम यांचा मृत्यू

27 जुलै 2015 ला अब्दुल कलाम भारतीय शास्त्र व्यवस्थापन शिलॉंग येथे “पृथ्वी नावाचा एक जिवंत ग्रह तयार करणे” या विषयावर व्याख्यान देण्यासाठी गेले. पायरीवरून जात असताना त्यांना काही अस्वस्थ वाटले, परंतु थोड्या विश्रांतीनंतर सभागृहात प्रवेश करण्यास सक्षम झाले. संध्याकाळी सुमारे साडेसाहा वाजता व्याख्यान देताना ते स्टेज वरून कोसळले. त्यांना जवळच्या बेथनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, तब्येत जास्त बिघडल्याने त्यांना आयसीयू मध्ये अॅडमिट करण्यात आले. ज्यानंतर त्यांनी आपला शेवटचा श्वास घेतला. 84 वर्षाच्या वयात अब्दुल कलम यांचे निधन झाले.

त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव शरीर शिलॉंग ते गुवाहाटी येथून भारतीय वायुसेना हेलिकॉप्टरमधून नेण्यात आले होते, तेथून ते 28 जुलैच्या सकाळी वायुसेना सी -130 जे हरक्यूलिसमध्ये नवी दिल्लीला गेले होते. 9 जुलैच्या सकाळी, कलामचे पार्थिव शरीर भारतीय ध्वजात लपेटले होते, त्यांना पालम एअर बेसवर नेले आणि दुपारी मदुराई विमानतळावर आगमन करून वायुसेना सी -130 जे विमानातून मदुराई येथे नेले. 30 जुलै 2015 रोजी त्यांच्या अंतिम संस्कारात पंतप्रधान, तामिळनाडुचे राज्यपाल आणि कर्नाटक, केरळ आणि आंध्रप्रदेशचे मुख्य मंत्री यांच्यासह 350,000 हून अधिक लोक उपस्थित होते.

अब्दुल कलाम यांचे विचार वाचा येथे

महत्वाचे प्रश्न

अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव. (abdul kalam full name in marathi)
Ans: डॉक्टर अवुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम.

अब्दुल कलाम यांचे जन्मगाव (abdul kalam birth place in marathi)
Ans: धनुषकोंडी गाव रामेश्वरम् तामिळनाडू.

डॉक्टर अब्दुल कलाम यांची जन्मतारीख (abdul kalam birth Date in marathi)
Ans: 15 ऑक्टोंबर 1931

डॉक्टर अब्दुल कलाम यांचा मृत्यू कधी झाला? (abdul kalam death date in marathi)
Ans: 27 जुलै 2015

तर मित्रांनो ही होती dr abdul kalam information in marathi आशा करतो की डॉ एपीजे अब्दुल कलाम मराठी माहिती तुम्हाला उपयुक्त ठरली असेल. या पोस्टला आपल्या मित्रांसोबत शेअर करून त्यांचेही ज्ञान वाढवा.

Related Posts

2 thoughts on “{जीवन चरित्र} डॉ एपीजे अब्दुल कलाम मराठी माहिती apj abdul kalam information in marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *