इंदिरा गांधी या भारताच्या चौथ्या आणि प्रथम महिला पंतप्रधान होत्या. त्यांनी भारतीय राजकरणा सोबत जगाच्या राजनीतीवर ही विलक्षण प्रभाव टाकला. आज आम्ही तुमच्या समोर इंदिरा गांधी मराठी जीवन परिचय ठेवणार आहोत. इंदिरा गांधी मराठी माहिती विद्यार्थ्याना इतिहासाचे ज्ञान वाढवण्यात उपयुक्त ठरेल. तर चला सुरू करूया..

Indira gandhi information in marathi
इंदिरा गांधींचे प्रारंभिक जीवन
इंदिरा गांधी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 ला उत्तर प्रदेश मधील अलाहाबाद (आजच्या प्रयागराज) शहरातल्या प्रसिद्ध नेहरू कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव ‘इंदिरा प्रियदर्शनी’ होते. त्यांचे वडील जवाहरलाल नेहरू आणि आजोबा मोतीलाल नेहरू होते. जवाहरलाल नेहरू आणि मोतीलाल नेहरू दोघीही वकील होते. भारताच्या स्वातंत्र्ययुद्धात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. इंदिरा गांधी यांच्या आईचे नाव कमला नेहरू होते. इंदिरा गांधी ही कमला नेहरू व जवाहरलाल नेहरू यांची एकुलती एक कन्या होती.
जवाहरलाल नेहरू नेहमी राजकीय कामात व्यस्त असत. त्यामुळे कुटुंबासोबत त्यांना जास्त वेळ घालवता येत नसे. याशिवाय कमला नेहरू यांचे स्वस्थही खराब राहत असे.
इंदिरा गांधी यांचे शिक्षण
राजकीय व्यस्ततेमुळे इंदिरा गांधी यांचे घरचे वातावरण शिक्षणासाठी अनुकूल नव्हते. इंदिरा गांधींनी पुणे विश्वविद्यालयातून मॅट्रिकची परीक्षा पास केली. त्यानंतर पश्चिम बंगालमधील रवींद्र टागोर यांच्या द्वारे स्थापित शांतिनिकेतन मधून त्यांनी शिक्षण प्राप्त केले. यानंतर त्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी लंडन मधील ऑक्सफर्ड विश्वविद्यालयात पाठवण्यात आले.
1936 मध्ये जेव्हा इंदिरा गांधी यांचे शिक्षण सुरू होते तेव्हा त्यांच्या आई कमला नेहरू यांचा क्षयरोगाने मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूच्या काळात पंडित नेहरू भारतीय तुरुंगात बंद होते.
इंदिरा गांधी यांचा विवाह
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये शिक्षण घेत असतांना इंदिरा गांधी यांची ओळख तेथे शिक्षण घेत असलेले भारतीय फिरोज गांधी यांच्याशी झाली. फिरोज गांधी एक पत्रकार व युवा काँग्रेसचे महत्त्वपूर्ण सदस्य होते. 1941 मध्ये वडिलांचा नकार असतानाही इंदिरा ने फिरोज गांधी यांच्याशी विवाह केला. नंतरच्या काळात फिरोज गांधी व इंदिरा गांधी यांना राजीव गांधी आणि संजय गांधी ही दोन मुले झाली.
फिरोज गांधी व महात्मा गांधी यांच्यात काहीही नाते नव्हते. खरे पाहता फिरोज गांधी पारसी समजाचे होते व त्यांचे पूर्ण नाव फिरोज जहांगीर घंडी (Ghandy) होते. त्याकाळात आंतरजातीय विवाहाला एवढी मान्यता नव्हती. म्हणून या जोडप्याला सार्वजनिक रूपाने नापसंत केले जाते. म्हणून महात्मा गांधी यांनी त्यांच्या विवाहाला समर्थन देत. इंदिरा नेहरू व फिरोज घंडी यांना गांधी हे आडनाव लावण्याची सल्ली दिली.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर इंदिरा गांधी यांचे वडील जवाहरलाल नेहरू हे देशाचे पहिले पंतप्रधान बनले. तेव्हा इंदिरा आपल्या वडिलांसोबत अलाहाबाद हून दिल्ली शिफ्ट झाली. परंतु फिरोज ने इंदिरा सोबत येण्यास नकार दिला. त्या काळात फिरोज गांधी हे मोतीलाल नेहरू यांनी सुरू केलेले वृत्तपत्र नॅशनल हेराल्ड मध्ये संपादकाचे काम पाहत होते.
Indira gandhi marathi mahiti
इंदिरा गांधींचे राजकीय करियर
नेहरू कुटुंब हे भारतीय राजकारणात जुने होते. म्हणून इंदिरा गांधींना राजकारणात येण्यास फार कष्ट करावे लागले नाहीत. काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी समितीने त्यांना सन 1955 मध्ये सामील करून घेतले.
सन 1959 साली 42 वर्षाच्या वयात इंदिरा गांधी यांना काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यात आले. पंडित नेहरू यांच्या या निर्णयावर अनेकांनी पक्षात कुटुंबावाद पसरविण्याचे आरोप लावले. परंतु त्या काळात या गोष्टींना जास्त वजन मिळाले नाही.
इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान
इंदिरा गांधी लागोपाठ दोन वेळा भारताच्या पंतप्रधान म्हणून कार्यरत राहिल्या. 11 जानेवारी 1966 मध्ये लाल बहादूर शास्त्री यांच्या अकस्मात मृत्यू नंतर इंदिरा गांधी यांना बहुमताने पंतप्रधान म्हणून निवडण्यात आले.
1971 चे भारत पाकिस्तान युद्ध
1971 मध्ये भारताला खूप मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. बांगलादेश च्या मुद्द्यावर भारत व पाकिस्तानात युद्ध सुरू झाले. 13 डिसेंबरला भारतीय सैन्याने ढाका ला चारही बाजूंनी वेढून घेतले. 16 डिसेंबरला पाकिस्तानी जनरल नियाजी ने 93 हजार सैनिकां समवेत हत्यार सोडून आत्मसमर्पण केले. युद्धात पराजयानंतर झुल्फिकार अली भुट्टो पाकिस्तानचे नवे राष्ट्रपती बनले त्यांनी भारता समोर शांतीचा प्रस्ताव ठेवला. हा प्रस्ताव इंदिरा गांधी यांनी स्वीकारला व दोन्ही देशांमध्ये शिमला तडजोड झाली.
पाकिस्तानच्या युद्धानंतर इंदिरा गांधी यांनी आपले लक्ष देशाच्या प्रगतीत लावले. भारतीय संसदेत त्यांना पूर्ण बहुमत होते, ज्यामुळे कोणताही निर्णय घेण्यात पूर्ण स्वतंत्रता होती. त्यांनी सन 1972 मध्ये विमा व कोळसा उद्योगाचे राष्ट्रीयीकरण केले. याशिवाय त्यांनी जमीन सुधार, समाज कल्याण आणि आर्थिक विकासासाठी अनेक प्रकल्प लागू केले.
देशातील एमर्जेंसी / आणीबाणी चा काळ
भारत-पाकिस्तान युद्धाच्या विजयामुळे इंदिरा गांधी यांना 1971 च्या निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाले होते. त्यांनी अनेक क्षेत्रात विकासासाठी कार्यक्रम देखील सुरू केले परंतु तरीही देशात समस्या वाढू लागल्या. अनियंत्रित भ्रष्टाचारामुळे इंदिरा गांधीच्या शासनाविरुद्ध देशात विपक्षी पक्षाची प्रदर्शने होऊ लागली. महागाई मुळे देशातील जनता त्रस्त होती. बेरोजगारी ची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलचे भाव दिवसेंदिवस वाढत होते. एकूणच देशात आर्थिक मंदीचा काळ सुरू होता ज्यामध्ये सर्व उद्योगधंदे ठप्प पडले होते. अश्या काळात इंदिरा गांधी वर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप होऊ लागले.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधी यांना पंतप्रधान पद खाली करण्यास सांगितले. इंदिरा गांधी विरुद्ध देशातील जनतेच्या क्रोध लक्षात घेऊन श्रीमती इंदिरा गांधी यांनी 26 जून 1975 ला सकाळच्या वेळी देशात आणीबाणी जाहीर केली. आणीबाणीच्या काळात त्यांनी सर्व विपक्षी राजकीय नेत्यांना ना कैद केले. त्याकाळात नागरिकांच्या घटनात्मक हक्कांना रद्द करण्यात आले. शासनाने वृत्तपत्र, रेडिओ आणि टीव्ही पत्रकारितेवर सक्त नियम लावले. देशात नसबंदी अभियान राबवण्यात आले.
1977 मध्ये आणीबाणी परत घेत इंदिरा गांधी यांनी निवडणुकीची घोषणा केली. त्याकाळात नागरिकांनी इंदिरा गांधीचे समर्थन केले नाही. मोरारजी देसाई आणि जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली ‘जनता दल’ या पक्षाने निवडणुकीत 542 पैकी 330 जागा प्राप्त केल्या. दुसरी कडे काँग्रेस पक्षाला फक्त 154 जागा मिळाल्या.
इंदिरा गांधी यांची सत्तेत वापसी
81 वर्षाचे मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाने 23 मार्च 1977 ला देशात सरकार बनवले. जनता पक्षात सुरुवातीपासूनच अंतर्गत कलह सुरू होता. ज्याचा परिणाम 1979 मध्ये सरकार पडले.
जनता पक्षाच्या शासन काळात इंदिरा गांधी वर अनेक आरोप लावण्यात आले. व त्यांना बऱ्याचदा तुरुंगातही पाठविण्यात आले. इंदिरा गांधी वर होत असलेल्या या अत्याचारांबद्दल त्यांना जनतेकडून सहानुभूती मिळाली. 1980 च्या निवडणुकीत त्यांनी आणीबाणी बद्दल जनतेकडून क्षमा मागितली व या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले इंदिरा गांधी पुन्हा एकदा सत्तेत आल्या.
ऑपरेशन ब्लू स्टार
1981 मधील सप्टेंबर महिन्यात एक शीख आतंकवादी समूह ‘खालिस्तान’ या नवीन देशाची मागणी करू लागला. या आतंकवाद्यांनी अमृतसर मधील सुवर्ण मंदिरात प्रवेश केला. मंदिर परिसरातील हजारो नागरिकांच्या उपस्थितीत इंदिरा गांधी यांनी सेनेला ऑपरेशन ब्लू स्टार करण्याची परवानगी दिली. सैन्याने तोप व बंदुकांचा सहारा घेतला व मंदिरावर तोप गोळ्यांचा वर्षाव केला. भारतीय सैन्याच्या या कारवाईत अनेक निर्दोष नागरिक मारले गेले. या नंतर शीख समाजात सांप्रदायिक तणाव निर्माण झाला. सरकारी सेवेत कार्यरत असलेल्या अनेक शीख धर्मियांनी राजीनामा दिला. शीख समुदायात इंदिरा गांधी विरुद्ध घोर आक्रोश निर्माण झाला.
इंदिरा गांधीची हत्या
31 ऑक्टोंबर 1948 ला इंदिरा गांधी यांचे दोन शीख अंगरक्षक सत्वंत सिंह आणि बित सिंह यांनी सुवर्ण मंदिरात झालेल्या नरसंहार च्या विरोधात इंदिरा गांधींची 31 गोळ्या मारून हत्या केली. ही घटना दिल्लीच्या सफदर्गांज रोडावर झाली
तर मित्रांनो ही होती Indira Gandhi information in Marathi आशा करतो की इंदिरा गांधी यांची ही मराठी माहिती तुमचे ज्ञान वाढवण्यात उपयुक्त ठरली असेल. तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांसोबतही शेयर करा. धन्यवाद…