{चरित्र } समर्थ रामदास स्वामी मराठी चरित्र sant ramdas information in marathi.

महाराष्ट्र भूमी महान संतांची भूमी आहे. महाराष्ट्रात झालेल्या महान संतांपैकी एक होते समर्थ रामदास. समर्थ रामदास यांनी दासबोध नावाचा प्रसिद्ध मराठी ग्रंथ लिहिला. आजच्या या लेखात आपण संत रामदास यांची माहिती मराठी मध्ये (sant ramdas information in marathi) मिळवणार आहोत. रामदास स्वामींना शिवाजी महाराजांचे गुरु म्हटले जाते. त्यानीच शिवरायांना स्वराज्य स्थापनेसाठी प्रेरित केले. तर चला samarth ramdas in marathi सुरू करुया…

sant ramdas information in marathi संत रामदास यांची माहिती मराठी

समर्थ रामदास स्वामी चरित्र मराठी (Ramdas swami information marathi)

समर्थ रामदास प्रारंभिक जीवन व बालपण

रामदास स्वामी यांचा जन्म 1608 ला महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील जांब या गावात रामनवमी च्या दिवशी एका ब्राह्मण कुटुंबात झाला. संत रामदासांचे पूर्ण नाव नारायण सूर्याजीपंत कुलकर्णी होते.

त्यांच्या वडिलांचे नाव सुर्याजी पंत आणि आईचे नाव राणुबाई होते. भगवान राम व सूर्याची उपासना त्यांच्या घरात केली जात असे. सूर्याजी पंत हे एक राजस्व अधिकारी होते. ब्राह्मण समाजाचे असल्याने त्यांचा अत्याधिक वेळ परमेश्वराच्या भक्तीत जात असे. नारायण यांना आपल्या वडिलांकडून धार्मिक शिक्षण प्राप्त झाले. आई व वडिलां शिवाय नारायण यांचे एक मोठे भाऊ गंगाधर होते.

नारायण लहानपणी खूप मस्तीखोर होते. दिवसभर गावात फिरणे व खेळणे त्यांचे काम होते. सात वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. घराची आर्थिक स्थिती चांगली होती परंतु नारायण लहानपणापासून विरक्त स्वभावाचे होते. एकदा त्यांची आई मस्ती व खेळाला कंटाळून त्यांच्यावर रागावली.

दुसऱ्या दिवशी नारायण सकाळपासून गायब झाले. त्यांच्या आईला चिंता होऊ लागली. त्यांनी दिवसभर नारायणाला गावात शोधले, परंतु कुठेही पत्ता लागला नाही. संध्याकाळी जेव्हा थकून त्या घरी आल्या तेव्हा नारायण त्यांच्या रुमात एका फळताडात सापडले. “काय करीत होतास” असे विचारल्यावर, “आई चिंता करितो विश्वाची” असे त्यांनी उत्तर दिले.

त्या दिवसापासून नारायणाचा जीवन क्रम पूर्णपणे बदलला. ते लोकांना आरोग्य व धर्मासंबंधी ज्ञान देऊ लागले. त्यांनी जागोजागी व्यायाम व योग करण्यासाठी व्यायाम शाळा बनवल्या. व हनुमानाची मूर्ती लाऊन पूजा करू लागले.

समर्थ रामदास स्वामींचा गृहत्याग (samarth ramdas in marathi)

नारायणाची संसारापासून विरक्ती पाहून त्यांच्या आईने त्यांचा विवाह करण्याचे ठरवले. त्यांना वाटत होते की या मुलाला संसारात अडकवले, तर तो ताळ्यावर येईल. व या कल्पनेने त्यांचे वयाच्या 12 व्या वर्षी लग्न ठरविण्यात आले. हा विवाह करण्याची त्यांची बिलकुल इच्छा नव्हती. लग्न मंडपात पुरोहितांने जसेही ‘सावधान’ शब्द उच्चारला तशी त्यांनी अंगावरील एका कापड्यानिशी पळ काढली. लोकांनी त्यांचा पाठलाग केला परंतु तातडीने त्यांनी गावाबाहेरील नदीत उडी घेतली.

तेथून पायी चालत ते नाशिक मधील पंचवटी ला पोहचले. नाशिक मध्ये आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी स्वतःचे नाव रामाचा दास अर्थात रामदास ठेवले. तेथे रामाचे दर्शन घेऊन त्यांनी नाशिक मधीलच टाकळी येथे मुक्काम ठोकला. टाकळी मधील एका उच्च टेकडीवर असलेल्या गुहेत त्यांनी 12 वर्षे तपश्चर्या केली.

वयाच्या बाराव्या वर्षी नाशिक येथे आलेल्या रामदास स्वामींनी पुढील 12 वर्षे तपश्चर्या केली. आपल्या या तपश्चर्येत ते दररोज पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठून 1200 सूर्यनमस्कार घालत असत. सूर्योदयापासून ते मध्यापर्यंत नदीच्या डोहात छातीइतक्या पाण्यात उभे राहून गायत्री मंत्राचे उच्चारण करत. दोन तास गायत्री मंत्राचा तर चार तास ‘श्रीराम जयराम जयजयराम’ या त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप करीत असत. समर्थ दुपारी केवळ पाच घरी भिक्षा मागून तिचा श्रीरामाला नैवेद्य दाखवत असत. त्यातील काही भाग पशुपक्ष्यांना ठेवून उरलेला भाग ग्रहण करत असत.

24 वर्षाच्या वयात त्यांना आत्मसाक्षात्काराची प्राप्ती झाली. समर्थांनी नाशिक येथे टाकळीला हनुमंताची मूर्ती स्थापन केली. हनुमान ही शक्तीची आणि बुद्धीची देवता आहे, त्यामुळे तिची उपासना केली पाहिजे असा समर्थांचा या मागील विचार होता.

समर्थ रामदासांचे भारत-भ्रमण (sant ramdas information in marathi)

समाधी तपश्चर्या संपल्यानंतर समर्थ रामदासांनी भारत भ्रमण केले. भारत भ्रमण दरम्यान त्यांची भेट शीख धर्माचे चौथे गुरु हरगोविंद यांच्याशी श्रीनगर येथे झाली. हरगोविंद हे त्यांना मुघल साम्राज्यात भारतीयांची होत असलेली दुर्दशा सांगत असत. मुस्लिम शासकांचे अत्याचार, व भारतीयांची स्थिती पाहून रामदास स्वामींना खूप दुःख झाले.

यानंतर त्यांनी आपल्या जीवनाचे लक्ष स्वराज्य स्थापन करणे केले. भारतीयांना संघटित करून अत्याचारी मुस्लिम शासनाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी प्रयत्न करणे सुरू केले. भारत प्रवासादरम्यान भेटणाऱ्या प्रत्येक शिष्याला ते सामर्थ्य आणि स्वाभिमानाचा संदेश देत असत.

समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज- samarth ramdas and shivaji maharaj

यानंतर समर्थ रामदासांची भेट छत्रपती शिवाजी महाराजांचीशी झाली. शिवाजी महाराजांना समर्थ रामदासांचे शिष्य मानले जाते. स्वराज्य रक्षणासाठी रामदासांनी शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केले. रामदासांच्या गुणांनी शिवाजीमहाराज प्रभावित होते व त्यांचे स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराजांनी दक्षिण भारतापर्यंत मराठा साम्राज्याचा विस्तार केला.

समर्थ रामदासांचा मृत्यू (Ramdas swami samadhi )

समर्थ रामदासांनी आपल्या जीवनाचे अंतिम क्षण मराठा साम्राज्याच्या सातारा जिल्ह्यातील सज्जनगड किल्ल्यावर घालवले. भगवान राम माता सीता व लक्ष्मण च्या मूर्तीसमोर रामदासांनी पाच दिवस निर्जल उपवास केला आणि पूर्वसूचना देऊन सन 1682 च्या माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला ते ब्रह्म समाधीत लीन झाले. समाधीच्या वेळी त्यांचे वय 73 वर्षे होते. ब्रह्म समाधीचे स्थान सज्जनगड जवळच त्यांची समाधी स्थित आहे. त्यांच्या या समाधी दिवसाला दासनवमी म्हणून साजरे केले जाते.

READ MORE:

साईबाबा जीवन चरित्र
स्वामी विवेकानंद जीवन चरित्र
संत ज्ञानेश्वर जीवन चरित्र

Related Posts

One thought on “{चरित्र } समर्थ रामदास स्वामी मराठी चरित्र sant ramdas information in marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *