अंजनवेल

हा किल्ला सोळाव्या शतकात विजापूर च्या राजाने बांधला व इ.स. १६६० च्या आसपास शिवाजी महाराजांनी याचे पुनरुज्जीवन केले.

१५ व्या शतकापूर्वी अंजनवेल येथें किल्ला नव्हता, पण मोजे गुढे तर्फ वलंबे येथें पवार उपनामक कोणी मराठा पुरुष गढी बांधून या भागावर अंमल चालवित होता असें इ. स. १८२४ च्या सुमारास नकलल्या गेलेल्या अंजनवेलची माहिती देणाऱ्या एका चोपड्यावरून दिसतें. इ. स. १५०२ च्या (शके १७२४) सुमारास विजापूरच्या मुस्तफाखान नामक सरदारानें सदरहू पवाराच्या गढ्या उध्वस्त करून दाभेम (दाभोळ) येथें सुभा स्थापन केला.

दाभोळ जिल्हा विजापूरकराकडे सुमारें १४९ वर्षें होता व इ. स. १६५१ (शके १५७४) च्या सुमारास शिवाजी महाराजांनी दाभोळ सुभा काबीज केला तेव्हां त्याबरोबरच अंजनवेल हा तालुका आला. शिवाजीच्या ताब्यात अंजनवेल गांव आला तेव्हां तेथें किल्ला अगोदरच बांधलेला होता.

पण शिवाजी महाराजांनी तो पुन्हा बांधून काढून त्याची मजबुती केली व त्या ठिकाणीं आपलीं एक गोदीहि स्थापन केली. शके १६२० मध्ये म्हणजे इ. स. १६९८ च्या सुमारास अंबरनाथ हबशी यानें मराठ्यांपासून अंजनवेल किल्ला काबीज केला व तो पुढे ४६ वर्षें म्हणजे इ. स. १७४४ (शके १६६५) पर्यंत त्याच्याकडेसच होता.

शके १६६६ मध्ये तो तुळाजीं आग्र्यानें शिद्दयापासून काबीज केला व पुढे ११ वर्षानंतर म्हणजे इ. स. १७५६ मध्ये तो पेशव्यांनीं रामाजी महादेव बिवलकर यास पाठवून आग्र्यांपासून जिंकून घेतला. यानंतर मात्र हा किल्ला ५३ वर्षें म्हणजे पेशवाईच्या अखेरपर्यंत पेशव्यांकडेच होता.

admin

Leave a Reply

Next Post

उमरेड

Fri May 3 , 2019
भारतातील महाराष्ट्र राज्याच्या नागपूर शहराच्या उमरेड या तहसिलीच्या गावी असलेला हा किल्ला आहे. या गावात दगडी तटबंदीची वेस आहे. या किल्ल्याचा प्रकार स्थळदुर्ग आहे. लालसर पिवळ्या वालुकाश्मांनी ती बांधलेली आहे.या किल्ल्यास सात बुरुज आहेत. हत्ती अंबारीसह प्रवेश करु शकेल एवढे मोठे लाकडी प्रवेशद्वार होते. इ.स. १७व्या शतकात याचे बांधकाम झाले […]
WhatsApp chat
%d bloggers like this: