अंतुरगड

अजंठा-सातमाळा या सह्याद्रीच्या पुर्वपश्चिम उपरांगेवर मोक्याच्या ठिकाणी अंतुरगड ठाण मांडून बसलेला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुकामध्ये अंतुरगड किल्ला आहे.

या भक्कम आणि बलदंड किल्ल्याची उभारणी एका मराठा सरदाराने केली होती. पुढे हा किल्ला अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात होता. मलीक अंबरच्या काळात येथे काही बांधकामे झाली. पुढे मोगली वावटळीत हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. इंग्रजांनी इतर किल्ल्याबरोबर याचाही ताबा पुढे मिळवला.

अंतुरच्या पुर्व अंगाला असणाऱ्या कड्याच्या पोटात दक्षिणेकडे तोंड करून हा दरवाजा आहे. अरुंद जागेत दरवाजा असल्यामुळे तो समोर गेल्याशिवाय चटकन दिसत नाही. येथे दरवाजाच्या बाहेर पहारेकऱ्यांच्या जागा आहेत. काही वर्षांपुर्वीपर्यंत (१९९० पर्यंत) या दरवाजाला लाकडी दारे होती. ती आता बेपत्ता झाली आहेत. या दारातून आत गेल्यावर आतील मार्ग तटबंदीने बंदिस्त केलेला असून तो अरुंद आहे. या मार्गावर वरुन खूपच दगडी पडलेली आहेत. पुढचा दरवाजा मात्र पुर्व दिशेला तोंड करून आहे. हा भव्य दरवाजा आहे. हा दरवाजा ओलांडून पुढे गेल्यावर तिसरा दरवाजा आहे.दुसऱ्या दरवाजाच्या आतील बाजूच्या कमानीवर शिल्पे आहेत. अशी शिल्पे अनेक ठिकाणी पहायला मिळतात.

पण येथे या शिल्पाबरोबर सजावटीसाठी तोफेचे चार गोळे वापरले आहेत. अशा प्रकारे केलेली सजावट महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेरही आढळत नाही. ही वैशिष्ट्यपूर्ण सजावट पाहून आपण तिसऱ्या दारावरील भव्य असा फारशी शिलालेख अवलोकन करून गड प्रवेश करायचा.आपला प्रवेश गडाच्या मध्यभागीच होतो. गड दक्षिणोत्तर पसरलेला असून तटबंदीने वेष्टित आहे. या तटबंदीच्या कडेने आपण उत्तर टोकाकडे चालू लागतो. उजवी कडील तटबंदीमध्ये काही बुरुज आहेत. डावीकडे एक टेकडी असून टेकडीच्या दक्षिण बाजूला भलामोठा तलाव आहे. टेकडीच्या उतारावर भव्य इमारत आहे.

इमारतीच्या गच्चीवर जाता येते. त्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे. टेकडीच्या माथ्यावर टेहाळणीकरिता भलामोठा चौथरा बांधलेला असून त्यावर चढण्यासाठी उत्तरेकडून पायऱ्या आहेत. या चौथऱ्यावरुन संपुर्णगडावर लक्ष ठेवता येते तसेच येथून अंजठा-सातमाळा रांगेचे उत्तम दर्शन होते. उत्तरेकडील खानदेशाचा परिसर न्याहाळता येतो.गडाचा दक्षिण भाग एका तटबंदीने वेगळा केलेला आहे. या तटबंदीमध्ये तीन दरवाजे आहेत. त्यापैकी मध्यभागी मोठा दरवाजा असून त्याला दक्षिण बाजूला दोन मोठे बुरुज आहेत. मधल्या टेकडीच्या पश्चिम उतारावर तटबंदीजवळ पाण्याचे टाके कोरलेले आहे.गडाचा उत्तर भाग बालेकिल्ल्यासारखा असून तो अधिकच भक्कम करण्यात आला आहे. या बाजूला किल्ला हा डोंगर रांगेशी जोडला गेला असल्यामुळे या बाजूला मोठा खंदक कोरलेला आहे. खंदकाच्या माथ्यावर भक्कम तटबंदी असून या तटबंदीला चिलखती बांधणी आहे. एक तोफ ही इथे पडलेली आहे.
7Z4OYpGvpmW20u98K49LdEYcf3B-LKLHmJnODWZ0Y9EGtwDfRtYBxWuG_VOYWwWLO9p9BN0_=w80-h80
Facebook
INSTALL
4.1
star_full_gray_24dp
FREE

admin

Leave a Reply

Next Post

चाकण किल्ला

Fri May 3 , 2019
पुण्यापासून २० मैलावर वसलेले चाकण पूर्वीचे खेडेगाव तर सध्याचे वाहन उद्योगाने प्रचंड विस्तारते शहर. चाकण मध्ये दोन्ही पैकी कुठल्याही वेशीतून प्रवेश केल्यानंतर अवघ्या काही अंतरावर जुन्या पुणे नाशिक रस्त्यावरून चालत आल्यास भग्नावस्थेतील तटबंदी दिसू लागते. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या चाकण गावात संग्रामदुर्ग किल्ल्याचा कोट फक्त शिल्लक राहिला आहे. इतिहासाची पाने डोळयासमोर […]
WhatsApp chat
%d bloggers like this: