Amazon Big Sell

अकोला जिल्हा

अकोला जिल्हा परिषद॓चा ईतिहास
अकोला जिल्हा
भारतात फार प्राचीन काळापासुन म्हणजे मौर्य, गुप्त इत्यादींच्या काळातही स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात होत्या व खेडे हा स्थानिक कारभारातील प्रमुख घटक होता. चोल राजांनी तर स्थानिक स्वराज्य संस्थाना विशेष उत्तेजन दिले होते. मनुस्मृती नारदस्मृती मध्ये ग्रामस्तरावर कार्य कराणा-या ग्रामपंचायतीसदृष ‘न्यायपंचायत’ या संस्थेचा उल्लेख आहे तर, इ.स. पूर्व तिस-या शतकात भारतात आलेल्या मॅगेस्थिनीसने केलेल्या लिखाणात नगर प्रशासनाचे वर्णन आले आहे.
भारताच्या आधुनिक इतिहासात लॉर्ड रिपनने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थापनेबाबत केलेले प्रयत्न व त्याने संमत केलेला इ.स.1882चा स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा लक्षात घेता लॉर्ड रिपन यास यथार्थतेने ‘स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक’ असे म्हटले जाते.
स्वातंत्रयोतर काळात पंचायतराज व्यवस्थेचे स्वरूप व कल्पना निश्चित करण्यासाठी मध्यवर्ती शासनाने1957मध्ये बलवंतराय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली होती. मेहता समितीने आपला अहवाल1958मध्ये सादर केला. या समितीने लोकशाहीच्या विकेंद्रिकरणावर भर दिला व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्रिस्तरीय रचनेची शिफारस केली. ग्रामीण स्थानिक संस्थांच्या या त्रिस्तरीय रचनेसच ‘पंचायतराज’ असे संबोधले जाते.
बलवंतराय मेहता समितीच्या अहवालाचा विचार करून पंचायतराज पध्दती महाराष्ट््रात कशा प्रकारे सुरू करता येईल किंवा लोकशाहीच्या विकेंद्रिकरणाची मेहता समितीची संकल्पना महाराष्टात कशा प्राकारे प्रत्यक्षात आणता येईल, याचा संखोल अभ्यास करण्यासाठी महाराष्ट राज्याचे त्यावेळचे महसूल मंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली1960मध्ये एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीने1961मध्ये आपला अहवाल सादर केला. या सपितीच्या शिफारसीनुसार महाराष्ट जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम1961संमत करण्यात आला व दिनांक1मे1962पासुन पंचायतराज व त्या अंतर्गत त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांची पध्दती स्विकारण्यात आली.
Asha Transcription

About admin

Check Also

सांगली जिल्हा

सांगली जिल्हा प्राचीन इतिहास असलेल्या सांगली जिल्ह्याने मौर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, यादव, बहामनी व मराठी …

Leave a Reply

Your email address will not be published.