अनुलोम विलोम प्राणायम

प्राणायामाच्या अभ्यासाची खोली खूपच मोठी आहे. पूरक (पूर्ण श्वास घेणे), रेचक (पूर्ण उच्छ्वास), कुंभक (श्वास शरीरात रोखणे), बाह्य कुंभक (श्वास शरीराबाहेर रोखणे) या संज्ञा आणि त्यांची प्रमाणे अपरिहार्य आहेत. तरीही आपण इथे थोडक्यात व सोप्या पद्धतीने अनुलोम-विलोम प्राणायाम अभ्यासणार आहोत. हठयोगप्रदीपिकेत सांगितलेल्या प्रमुख 8 प्राणायामांच्या अभ्यासापूर्वी हा शुद्धी प्राणायाम करणे योग्य ठरते. यामध्ये पूरक श्वास घेतलेल्या नाकपुडीच्या विरुद्ध बाजूच्या नाकपुडीने रेचक (प्रश्वास) सोडला जातो. म्हणून याला ‘अनुलोम-विलोम’ प्राणायाम म्हणतात.

कृती :
प्राणायाम म्हणजे अष्टांग योगातील चौथे अंग. बहिरंग योगाकडून अंतरंग योगाकडे जाण्याचे महत्त्वाचे वळण. प्राण म्हणजे श्वसन आणि आयाम म्हणजे नियंत्रण, नियोजन. जगण्यासाठी आवश्यक असलेली प्राणशक्ती आपल्याला श्वसनामार्फतच मिळत असते. माणसाच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्पंदनांशी श्वसनाचे अतूट नाते आहे. म्हणून सर्वार्थाने उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य मिळवणासाठी योग्य तंत्राचा वापर करून, लक्षपूर्वक आपल्या श्वसनाचे नियमन करण्याचे अतिमहत्त्वाचे काम म्हणजेच प्राणायाम. आसनांनी दृढ क्रियांनी शुद्ध झालेले शरीरच प्राणायाम करण्यास योग्य होते.
-       नंतर जालंधर बंध सोडावा. उजव्या हाताच्या अनामिका व करांगुळी या बोटांनी डावी नाकपुडी बंद करावी. डोके वर करावे. दृष्टी सरळ करावी. उजवी नाकपुडी मोकळी करावी.

सावधानता : नाकपुड्या चोंदलेल्या असल्यास प्राणायाम करू नये. हृदय किंवा फुप्फुसांशी निगडित काही गंभीर आजार असल्यास तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच हा प्राणायाम अभ्यासावा.
-       पूरक झाल्यावर उजव्या हाताच्या चारही बोटांनी डावी नाकपुडी बंद करावी. डोके खाली करून हनुवटी छातीस टेकवून ठेवावी. ओटीपोट अधिक आत खेचावे. दृष्टी नाकाच्या शेंड्यावर किंवा भुवयांच्या मध्ये स्थिर करावी. श्वास रोखून धरावा.
-       उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करावी. बोटे एकमेकांना चिकटवून ठेवावीत. सावकाश एकाच गतीने डाव्या नाकपुडीने पूरक करावा.
-       उजव्या नाकपुडीने सावकाश रेचक करावा. पूरकापेक्षा रेचक जास्ती वेळात करण्याचा प्रयत्न करावा.
पूर्वस्थिती : पद्मासनात किंवा इतर कोणत्याही बैठकीच्या आसनामध्ये पाठीचा कणा सरळ ठेवून बसावे.

– नंतर उजव्या नाकपुडीने डाव्या नाकपुडीप्रमाणेच पूरक करावा. क्षमतेनुसार कुंभक करावा व शेवटी डाव्या नाकपुडीने रेचक करावा. या दोन्ही क्रिया मिळून (1 ते 5 आकडे) प्राणायामाचे एक आवर्तन होते. डोळे मिटूनच ठेवावेत. मन श्वसनावर केंद्रित करावे.
आवर्तने : 5 आवर्तनांनी सुरुवात करून, दिवसात एक आवर्तन वाढवून दररोज 20 आवर्तने करावीत.

लाभ :
-       श्वसनमार्गाची शुद्धी होते व इतर प्रकारच्या प्राणायामांची पूर्ण व पूर्व तयारी होते.
-       श्वसन सुरळीत व नियंत्रित होते.
-       श्वसनाशी जोडलेले मन शांत होते व हृदयाचे कार्य लयबद्ध होते. त्यामुळे आपोआपच शारीरिक व मानसिक संतुलन निर्माण होते.
-       श्वास रोखण्याची म्हणजेच कुंभकाची क्षमता निर्माण होते.
-       मनाची दुर्बलता, अनामिक भय, न्यूनगंड अशा मानसिक आजारांपासून दूर राहण्याकरता व त्यावरील उपचार म्हणून या प्राणायामाचा खूपच उपयोग होतो.

Check Also

प्राण मुद्रा

प्राण मुद्रा

प्राण मुद्रा कृति – प्रथम करंगळी व त्याचे शेजारजे बोट हे अंगठयाचे मुळाशी लावून त्यावर …

अपानमुद्रा

अपानमुद्रा

अपानमुद्रा कृति – या मुद्रेमध्ये आपण मधली दोन बोटे अंगठयाचे मुळाशी टेकवून मधल्या बोटावर अंगठयाने …

jalodarnashak mudra

जलोदरनाशक मुद्रा

कृति – प्रथम आपली करंगळी अंगठयाचे मुळाशी टेकवावी. – अंगठयाने करंगळीवर हलका दाब द्यावा. – …

varun mudra

वरूण मुद्रा

कृति – प्रथम आपले सर्वात छोटे बोट म्हणजे करंगळी, याचा अग्रभाग अंगठयाचे अग्रभागी सावकाश टेकवावा. …

Leave a Reply

error: माफ करा ही माहिती कॉपीराइट प्रोटेक्टेड आहे..