अर्धचंद्रासन

1) अर्धचंद्रासन या नावातच या आसनाची क्रिया दर्शविण्यात आली आहे. व्यक्ती हे आसन करताना त्याच्या शरीराची स्थिती अर्ध चंद्रासारखी होते. त्यामुळे या आसनाचे नाव अर्धचंद्रासन असे ठेवण्यात अले असावे. तसेच अर्धचंद्रासन करताना शरीराची स्थिती त्रिकोणासम ही होत असल्याने या आसनाला त्रिकोणासन ही म्हटले जाते. कारण अर्धचंद्रासन व त्रिकोणासन यांच्या फारसे अंतर नाही.

2) पद्धत : आसनस्थ होण्यासाठी आधी दोन्ही पायांची पंजे व बोटे व्यवस्थित करून ताठ उभे राहावे. दोन्ही हात कमरेला चिटकवून सरळ ठेवून मान सरळ ठेवावी.

3) दोन्ही पाय साधारण एक ते दीड फूट एकमेकापासून दूर ठेवावेत. पाठीचा कणा सरळ ठेवावा. उजवा हात वर उचलून खांद्याच्या समांतर रेषेत आणून हाताच्या पंज्याला आकाशाच्या बाजूने वर उचलून कानाला चिटकवून सरळ करावा. या स्थितीत मात्र डावा हात जमिनीच्याच बाजूने पूर्वीच्या आहे त्याच स्थितीत ठेवावा.

4) त्यानंतर आहे त्या स्थितीत कमरेवरून डाव्या बाजूने झुकावे. अशा वेळी आपला डावा हात देखील आपोआप खालच्या बाजूला सरकत जाईल. मात्र एक लक्षात घ्या की, डावा हात व पाय एकमेकापासून दूर होता कामा नये.
जेवढे डाव्या बाजूला झुकता येईल तेवढे झुकण्याचा प्रयत्न करावा व अर्धचंद्राचा आकार शरीर घेईल अशा स्थितीत 30 ते 40 सेकंदापर्यंत आहे त्या स्थितीत राहावे. त्यानंतर हळू हळू पुन्हा सरळ उभे राहावे व हात जमिनीकडे आणत कमरेला चिटकवावा.

5) आता हिच क्रिया दुसऱ्या म्हणजे डाव्या हाताने करावी. अर्धचंद्रासन दररोज चार ते पाच वेळा केल्याने चांगला फायदा होतो.

6) सावधगिरी : पाठीचा आजार असेल तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

7) फायदा : अर्धचंद्रासन केल्याने गुडघे, किडनी, छोटी आतडे, जठर, छाती व मान यांचे विकार दूर होतात. तसेच श्वास विकार, पोटावरील चरबी कमी होणे, स्नायुमध्ये बळकट होऊन छातीचा विकास होतो.

Check Also

प्राण मुद्रा

प्राण मुद्रा

प्राण मुद्रा कृति – प्रथम करंगळी व त्याचे शेजारजे बोट हे अंगठयाचे मुळाशी लावून त्यावर …

अपानमुद्रा

अपानमुद्रा

अपानमुद्रा कृति – या मुद्रेमध्ये आपण मधली दोन बोटे अंगठयाचे मुळाशी टेकवून मधल्या बोटावर अंगठयाने …

jalodarnashak mudra

जलोदरनाशक मुद्रा

कृति – प्रथम आपली करंगळी अंगठयाचे मुळाशी टेकवावी. – अंगठयाने करंगळीवर हलका दाब द्यावा. – …

varun mudra

वरूण मुद्रा

कृति – प्रथम आपले सर्वात छोटे बोट म्हणजे करंगळी, याचा अग्रभाग अंगठयाचे अग्रभागी सावकाश टेकवावा. …

Leave a Reply