loading...

अशीरगड

दंतकथांवरून ख्रि. पू. १६०० वर्षांपासून येथें क्षत्रिय राजे होते. यानंतर तुंतुरपाल या चौहान राजानें अशिरगड व गोवळकोंडें घेतल्याचा भाटांच्या गीतांत उल्लेख आहे (टॉडचें राजस्थान). ‘यानंतरचे अशीरगडचे टाक’ (रजपूत जात, असा चांदभाटाच्या गीतांत उल्लेख आढळतो. यानंतर हाडा घराण्याचा संस्थापक इष्टपाल याचेकडे हा किल्ला गेला. (टॉडचें राजस्थान).

loading...

याचे पणतू हमीर आणि गंभीर हे पृथ्वीराजाचे मांडलिक होते. हा किल्ला आसा अहीर यानें बांधला व इ. स. १३७० पर्यंत तो त्याच्या ताब्यांत होता असें फेरिस्तानें म्हटलें आहे. पण तें संभवनीय दिसत नाही. तेराव्या शतकाच्या अखेरीस अल्लाउद्दीन खिलजी यानें हा घेऊन एकाशिवाय सर्व हाडा घराण्याची कत्तल केली. नंतर तो पुन्हां हिंदूंच्या हातांत गेला होता तो चवदाव्या शतकाच्या अखेरीस नासिरखान फरूकि यानें कपटानें घेतला. याच घराण्यातींल पांचवा राजा अदिलखान (पहिला—१४५७—१५०३) यानें तिसरा तट मालइगड बांधला. अकबराने अकरा महिने वेढा देऊन हा मोठया मुष्किलीनें घेतला (१६००) असें इलियट म्हणतो. या वेढयाबद्दल मुख्य दरवाजाजवळ शिलालेख आहे (१००९ हि. १६०० इसवी) अवरंगजेबाचे वेळची एक तोफ व एक शिलालेख आहे.

निजाम उलमुल्क यानें हा १७२० मध्यें लाच देऊन घेतला (इलियट). मराठयांच्या इतिहासांतहि अशीरगड हा उत्तरेच्या मार्गातील नाक्यावर असल्यामुळें फार महत्त्वाचा होता. हा घेतल्या बद्दलचा प्रथम उल्लेख बाळाजी बाजीराव यानें गोविंद बल्लाळास ता. १४ फेब्रुवारी १७६० रोजीं पाठविलेल्या पत्रांत ‘इकडील मोगल मारल्या दाखल करून पंचेचाळिसाची जागीर, बराणपुर, “अशेर” दौलताबाद घेतली” असा आढळतो. (रा. खं. १. १६४. २५४). त्याच सुमारास बाबूराव बुंदेले गोविंदपंतास निजामानें आसेरी व दबलताबाद हे दोन किल्ले दिल्याचें लिहितो (१५ फेब्रु. १७६०) रा. खं. १. १६५. २५७) व सदाशिवरावभाऊ अशाच आशयाचें पत्र गोविंदपंतास लिहितो (१९।२।१७६० .

पत्र १६६). तसेच दिल्लीचा बादशहा शाहूराजास चौथाई घेऊन बाकी ऐवज किस्तीप्रमाणें द्यावा असें लिहून महालांची यादी देतो; त्यांत प्रा जुन्नर तर्फा १३ तालुके दिले आहेत त्यां मध्यें अशेरी अशीरगड एक आहे. (रा. ख. ८. ७८. १०५) यानंतर १६९७ फाल्गुन शु॥ ८ च्या पत्रांत “जाबीत जंग हरि बल्लाळास सामील झाले असून नगर व अशेरी दोन किल्ले मागतात,” हरि बल्लाळ लढाई मारल्याखेरीज देण्याचें कबूल करीत नाहींत इत्यादि बारभाईकडील वर्तमान राघोबाकडून लक्ष्मण अप्पाजी गोसावी यास लिहिलें आहे. (रा. खं. १२१३३. ८४) एवचं इ. स. १७६० मध्यें हा पेशव्याच्या ताब्यांत आला व नंतर अठरा वर्षांनी तो महादजी शिंद्यास मिळाला (ग्रँटडफ) इ.स. १८०३ मध्यें असईच्या लढाईनंतर ब्रिटिशांनीं घेतला परंतु तहानंतर व तो पुन्हा शिंद्यास मिळाला. नंतर १८१९ मध्यें हा ब्रिटिशांनीं पुन्हा घेतला.

admin

Leave a Reply

Next Post

असावगड

Fri May 3 , 2019
असावगड असावगड ठाणे जिल्ह्यातील बोईसर हे महत्वाचे शहर आहे. प्राचीनकाळी शूर्पारक, डहाणू , तारापूर, श्रीस्थानक/ स्थानकीय पत्तन (ठाणे), कालियान (कल्याण) इत्यादी बंदरातून मोठ्या प्रमाणात परदेशांशी व्यापार होत. या बंदरात उतरणारा माल विविध मार्गांनी देशावर जात असे. या मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी किल्ले बांधले जात. यापैकीच एक आसावा किल्ला डहाणू […]
loading...
WhatsApp chat
%d bloggers like this: