Amazon Big Sell

असावगड

असावगड

असावगड ठाणे जिल्ह्यातील बोईसर हे महत्वाचे शहर आहे. प्राचीनकाळी शूर्पारक, डहाणू , तारापूर, श्रीस्थानक/ स्थानकीय पत्तन (ठाणे), कालियान (कल्याण) इत्यादी बंदरातून मोठ्या प्रमाणात परदेशांशी व्यापार होत. या बंदरात उतरणारा माल विविध मार्गांनी देशावर जात असे. या मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी किल्ले बांधले जात. यापैकीच एक आसावा किल्ला डहाणू व तारापूर बंदरांना देशाशी जोडणार्‍या मार्गांवर प्राचीन काळी बांधण्यात आला. ठाण्यातील पूरातन किल्ला चढण्यास सोपा असून गर्द रानातून जाणार्‍या रस्त्यामुळे हा एक दिवसाचा ट्रेक अल्हाददायक होतो.

पहाण्याची ठिकाणे :

गडाच्या तटबंदी वरून आपला गडावर प्रवेश होतो. गडाची तटबंदी दगड एकमेकांवर रचून बनवलेली आहे. गडाच्या माथ्यावर कातळात खोदलेली २ टाकी आहेत. त्यापैकी मोठ्या टाक्यातील पाणी पिण्या योग्य आहे. किल्ल्याच्या दक्षिण टोकाला प्रचंड मोठे बांधीव टाकं आहे. या टाक्याची लांबी ५० फूट ,रूंदी २० फूट व खोली १५ फूट आहे. या टाक्याचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या एका बाजूला कातळ आहे व उरलेल्या तीन बाजू घडीव दगडांनी बांधून काढलेल्या आहेत. टाक्याच्या पश्चिमेकडील भिंतीत टाक्यात उतरण्यासाठी पायर्‍या बनवलेल्या आहेत. कातळ उतरावरून येणारे पाणी टाक्यात जमा होण्यापूर्वी त्यातील गाळ निघून जावा यासाठी कातळात १ फूट व्यास व 6 इंच खोली असलेले वर्तूळाकार खड्डे कोरलेले आहेत. या टाक्याची भिंत फूटल्याने यात आता पाणी साठत नाही.

हे टाकं पाहून उत्तरेकडे चालत जातांना डाव्या हाताला पश्चिमाभिमुख प्रवेशव्दाराची जागा दिसते. प्रवेशव्दार व त्यापुढील देवड्यांचे अवशेष पहायला मिळतात. प्रवेशव्दारातून खाली उतरून गेल्यावर डाव्या बाजूस भिंतीचे अवशेष दिसतात तसेच कातळात खोदलेल्या काही पायर्‍याही पहायला मिळतात.

प्रवेशव्दार पाहून किल्ल्यात शिरल्यावर समोरच एक भिंत दिसते, ती एका बांधीव टाक्याचीच भिंत आहे. हे टाकं लहान असून त्याची रचना मोठया टाक्याप्रमाणेच एका बाजूला कातळ व तीन बाजूंनी दगडी भिंत अशी केलेली आढळते. या टाक्याच्या एका बाजूला असलेल्या कातळात पन्हाळी (चर) खोदलेला आहे. या चरातून येणारे पाणी टाक्याला लागून बांधलेल्या छोट्या हौदात पडेल आणि तो हौद भरल्यावर ते पाणी टाक्यात पडेल अशी योजना केलेली आहे. या रचनेमुळे गाळ हौदात जमा होऊन स्वच्छ पाणीच टाक्यात पडेल. या टाक्या जवळील कातळात काही पायर्‍या कोरलेल्या आहेत.

याशिवाय किल्ल्याच्या खालच्या बाजूस कातळात खोदलेली गुहा व टाकं आहे. ते पहाण्यासाठी मोठ्या टाक्या जवळून खाली उतरून किल्ल्याच्या दक्षिण टोकाला वळसा घालून पूर्वेकडे (बारीपाडा गावाच्या दिशेला) जावे लागते. गुहा पाहील्यावर आपली गडफेरी संपते. गुहे जवळून खाली उतरण्यासाठी पायवाट आहे. पण ती फारशी वापरात नसल्याने वाटाड्या बरोबर असेल तरच या वाटेने उतरावे.

गडावरून दक्षिणेला पालघरचा देवकोप तलाव दिसतो.

Asha Transcription

About admin

Check Also

किल्ले रोहिडेश्वर

सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक सुरेख डोंगरमार्ग आहे. या डोंगररांगेत ३ ते ४ …

Leave a Reply

Your email address will not be published.