आंबोळगड

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालूक्यात दोन किनारी दूर्ग आहेत ते म्हणजे आंबोळगड व यशवंत गड. “मुसाकाजी” या प्राचिन बंदरावर तसेच समुद्रावर नजर ठेवण्यासाठी आंबोळगड बांधण्यात आला. १८१८ मध्ये कर्नल इमलॉक याने हा किल्ला जिंकला. १८६२ नंतर आंबोळगडावरील वस्ती उठली.

आंबोळगड हा उंचवट्यावर वसवलेला किल्ला आहे. किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे १२०० चौरस मीटर आहे. किल्ल्याच्या दक्षिणेस समुद्र व उत्तर आणि पश्चिमेस खंदक आहे.

किल्ल्याची अवस्था फारच बिकट आहे. समुद्राच्या बाजूची काही तटबंदी शाबूत आहे. याशिवाय किल्ल्यात एक चौकोनी विहिर व वाड्यांची जोती आहेत. किल्ल्याजवळच्या सड्यावर गगनगिरी महाराजांचा मठ आहे.

Check Also

रोहिडा किल्ला

Rohida Fort Rohida Fort : सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक सुरेख डोंगरमार्ग आहे. …

8 comments

Leave a Reply