आदिवासी उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता प्रशिक्षण केंद्र.

अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
योजनेचे नाव : आदिवासी उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता प्रशिक्षण केंद्र.
योजने बद्दलचा शासन निर्णय :
  • 1 ESE-2004/C.R.119/ESE-1, Mantralaya, Mumbai-32, Dated: 16th January, 2006 To increase Stipend, increase in lecturer’s honorarium & free supply of Set of 4 book in the Scheme of Coachincg-cum-Guidance Center for Tribal
  • 2 EMP-1491/1213/(296/91)/EMP:2, Mantralaya,Mumbai-32, Dated: 20th January, 1994 To establish a Employment Training & Guidance Center for Tribal unemployed youth in Gadchiroli District
  • 3 EMP-1491/(229/91)/EMP-2,Mantralaya, Mumbai-32,Dated: 14th January, 1992 Increase in Stipend Rate of Training Tribal Youth
  • 4 EMP-1490/177(32)EMP-2,Mantralaya,Mumbai-32, Dated: 12th July, 1990 To Increase in honorarium rate of Lecturer’s of Coaching-cum-Guidance Center for Tribal youth.
  • 5 EMP-1085/9596/(8205)/EMP-2, Mantralaya, Mumbai-32, Dated: 30th September, 1985 Coaching-cum-Guidance Center For Tribal Deori,dist. Bhandara, (2) Chandrapur, Dist. Chandrapur,(3) Manchar, Tal. Ambegoan, Dist.pune & (4) Kinwat, Dist. Nanded —Establishment of Guidance Center
  • 6 EMP-1084/7306/(7779)/EMP-2,Mantralaya, Mumbai-32,Dated: 11th October, 1984 To establish a Employment Training & Guidance Center for Tribal unemployed youth
योजनेचा प्रकार : योजनेत्तर
योजनेचा उद्देश :
  • शासकीय सेवेत आदिवासी प्रवर्गाकरीता असलेली राखीव पदे योग्य उमेदवारांप्राणे पूर्णपणे भरली जावू शकत नाही व सदर पदे रिक्त राहतात. याकरीता आदिवासी उमेदवारांचा विकास व उन्नती होवून त्यांची स्थिती सुधारण्याच्या उपक्रमानुसार विविध स्पर्धा परिक्षांकरीता आदिवासी उमेदवारांची तयारी करुन घेण्याकरीता राज्यांत 1. जिल्हा पुणे (मंचर), २. जिल्हा जळगांव (रावेर), ३. जिल्हानाशिक (कळवण), ४. जिल्हानांदेड (किनवट),५. जिल्हाअमरावती (अचलपूर), ६.जिल्हाभंडारा (देवरी), ७. जिल्हा चंद्रपूर (चंद्रपूर), ८. जिल्हा गडचिरोली ( गडचिरोली ) अशी आठ ठिकाणी स्थापना करण्यांत आली आहे.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : आदिवासी प्रवर्गासाठी
योजनेच्या प्रमुख अटी : आदिवासी उमेदवारांनी कार्यालयांच्या वेबपोर्टलवर नावनोंदणी करणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे : नोंदणी कार्ड, तसेच शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : आदिवासी उमेदवारांची स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करुन घेण्यासाठी सदर केंद्रांमार्फत साडेतीन महिन्याचे एक याप्रमाणे दरवर्षी तीन प्रशिक्षण सत्रे चालविली जातात. शासन निर्णय क्रमांक रोस्वरो२००४/प्र.क्र.११९/रोस्वरो१ दिनांक १६ जानेवारी, २००६ अन्वये योजनेतील प्रशिक्षणार्थ्याच्या विद्यावेतन तसेच तज्ञ व्याख्यात्यांच्या मानधनात डिसेंबर, २००५ पासून वाढ करण्यात आलेली आहे. प्रशिक्षणाच्या काळात आदिवासी प्रशिक्षणार्थीना दरमहा रुाये १०००/ याप्रमाणे विद्यावेतन दिले जाते व व्याख्यात्यांना दर ताशी रुपये १००/ प्रमाणे मानधन दिले जाते. तसेच प्रशिक्षणार्थ्याना र्स्प्धा परिक्षा तयारीसाठी आवश्यक असलेल्या ४ पुस्तकांचा संच मोफत देण्यात येतो. प्रशिक्षण देण्यासाठी जवळच्या महाविद्यालयातील तज्ञ प्राध्यापकांना तासिका पध्दतीवर नियुकत केले जाते तसेच, गरजेनुसार बँक, वित्तीय संस्था, मान्यवर सेवाभावी संस्था यातील अधिकारी पदाधिकायांना व शासनाच्या तज्ञ अधिकायांना मार्गदर्शनपर भाषणे देण्यासाठी निमंत्रित केले जाते. उमेदवारांना विविध रिक्तपदांची, स्पर्धा परीक्षांची माहिती वेळोवेळी पोस्टाने कळव ली जाते. फॉर्म्स पाठविले जातात. प्रसंगानुसार खास प्रशिक्षण वर्ग आयोजिले जातात. सध्या आठ ठिकाणी अशी केंद्रे कार्यरत आहेत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पध्दतीने
१० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : कमीत कमी एक महिना
११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता संचालनालय, कोकणभवन, नवी मुंबई
१२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: http://www.maharojgar.gov.in

Check Also

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव …

One comment

  1. नावनोंदणी कोणत्या website var karychi

Leave a Reply