Asha Transcription

आपल्या हॉस्टेल विषयी माहिती सांगणारे आईला पत्र

दिनांक १८.१२.२०१८

प्रिय आईस,
साष्टांग नमस्कार

माझा विश्वास आहे की तुम्ही सर्व खुशाल असाल.
मी येथे उत्तम आहे तुला माझ्याबद्दल चिंता करण्याची गरज नाही. मी हॉस्टेल आणि विद्यालय यामध्ये गुंतून गेली आहे .मला इथे राहण्यात आता कसलीही अडचण येत नाही.माझी रूम पहिल्या मजल्यावर आहे. माझ्या रूम मध्ये माझ्या सोबत आणखी एक मुलगी राहते. तीच नाव शामला आहे आणि ती नाशिक ची आहे .तीही माझ्या वर्गातलीच आहे. आम्ही आता चांगल्या मैत्रिणी झाल्या आहोत आणि रोज एकत्रच जातो येतो. तिने मला होस्टेलच्या सर्व सवयी अवगत करून दिल्या आहेत.तिच्या आणखी मैत्रिणी पण माझ्या ओळखीच्या झाल्या आहोत. तर मला आता एकटेपण नाही वाटत.
हॉस्टेलचा पर्यावरण अभ्यासास खूपच उपयुक्त आहे. कारण आम्ही वेळापत्रकानुसार अभ्यास करतो. त्यामुळे आम्हाला अभ्यास आणि खेळण्यासाठी भरपूर वेळ मिळतो. माझ्या सर्व मैत्रिणीनं त्यांच्या अभ्यासात खूप रस आहे. म्हणूनच आमच्या अभ्यासाच्या विषयांवर बर्याच वादविवाद होत असतात ज्यामुळे एखाद विषय सहजतेने लक्षात राहते. हॉस्टेल मध्ये खूप सारे नियम आहेत ज्यामुळे आम्ही नेहमी अनुशासित राहतो.
मी एक गोष्ट मान्य करते कि मी आता हि जास्त जेवत नाही. पण आई तुझ्या हातच्या जेवणाची खूप आठवण येते. तशी मला आता होस्टेलच्या जेवणाची सवय झाली आहे तरी तू चिंता करु नकोस.
आई मला तुझी आणि पप्पांची कमी जाणवते.येणाऱ्या उन्हाळी सुट्टीची मी आतुरतेने वाट पाहत आहे ,तेव्हा मी घरी येऊ शकेन.

तुझी लाडकी मनाली
9 / 13

Asha Transcription

About admin

Check Also

school letter writing marathi

शाळेच्या वार्षिक संमेलनात पारितोषिक मिळवल्या बद्दल वडिलांना वर्णन पत्र.

School Letter Writing Marathi दिनांक :-२० सप्टेंबर २०१८ कांदिवली पूर्व, मुंबई तीर्थरूप बाबांस, चि . …

Leave a Reply

Your email address will not be published.