Amazon Big Sell

उच्च व व्यावसायिक शिक्षणासाठी राज्य शासनाची अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती

अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
योजनेचे नाव : उच्च व व्यावसायिक शिक्षणासाठी राज्य शासनाची अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती
योजने बद्दलचा शासन निर्णय : अल्पसंख्याक विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक-अविवि- २०११/ प्र.क्र.४४/का-६ दि.१४/१०/२०११. सदर शासन निर्णय याच संकेतस्थळावर “ शासन निर्णय” या सदराखाली उपलब्ध आहे.
योजनेचा प्रकार : राज्य शासन पुरस्कृत योजना
योजनेचा उद्देश : अल्पसंख्याक प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रेरीत करणे.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्व अल्पसंख्याक प्रवर्ग (मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, पारशी, बौद्ध व जैन)
योजनेच्या प्रमुख अटी :
 • 1. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा
 • 2. अर्जदाराने माध्यमिक शालांत परीक्षा महाराष्ट्र राज्यातून उत्तीर्ण केलेली असावी.
 • 3. अर्जदाराच्या पालकांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.६.०० लाखापेक्षा जास्त नसावे.
 • 4. अर्जदार इतर कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेचा लाभार्थी नसावा.
 • 5. नूतनीकरणासाठी अर्जदाराने पुढील वर्षात प्रवेश घेतलेला असणे आवश्यक आहे
आवश्यक कागदपत्रे :
 • 1)माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षेची गुणपत्रिका
 • 2) उत्पन्नाचा दाखला
 • 3)अधिवास प्रमाणपत्र
 • 4) अल्पसंख्याक असल्याबाबतचे स्वयंसाक्षांकीत प्रतिज्ञापत्र
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : सदर योजनेंतर्गत तांत्रिक व व्यावसायिक अभ्यासक्रम तसेच वैद्यकीय व अर्धवैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रतिवर्ष रु. २५,०००/- किंवा प्रत्यक्ष वार्षिक शैक्षणिक शुल्क यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढी रक्कम शिष्यवृत्ती म्हणून देण्यात येते पात्र विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम E.C.S. /N.E.E.T द्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये थेटपणे जमा करण्यात येते.
अर्ज करण्याची पद्धत : सदर योजनेचा अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक व जाहिरात दरवर्षी संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय व संचालक वैद्यकीय शिक्षण संचालनालय यांचेमार्फत प्रमुख् वृत्तपत्रांमध्ये प्रसिध्द करण्यात येते.
१० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : सुमारे 2 – 3 महिने
११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : वैद्यकीय व अर्ध वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या शिष्यवृत्तीसाठी संचालक, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय इमारत चौथा मजला, सेंट जॉर्जेस रुग्णालय आवार, मुंबई-4०० 00१ आणि तांत्रिक व व्यावसायिक शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या शिष्यवृत्तीसाठी संचालक,तंत्र शिक्षण संचालनालय ३ महापालिका मार्ग, मुंबई-400 ००१ यांचेकडे संपर्क साधावा.
१२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: सदर वेळापत्रकानुसार संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी खालील संकेत स्थळांवर क्लिक करा.

 • www.dmer.org
 • www.dte.org.in
Asha Transcription

Check Also

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव …

Leave a Reply