उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम.

अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
योजनेचे नाव : उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम.
योजने बद्दलचा शासन निर्णय :
 • 1.उ.ऊ. व का.वि. शा.नि.क्र. एसएसआय-2001/3062/(6226)/उ-18 दि.07.02.2002
 • 2.उ.ऊ. व का.वि. शा.नि.क्र. एसएसआय-2003/प्र.क्र.7918/उ-18 दि.29.10.2007.
योजनेचा प्रकार : जिल्हा वार्षिक योजना- योजनांतर्गत योजना
योजनेचा उद्देश : सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगारासाठी प्रवृत्त करण्याच्या दृष्टीने उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जातो. सदर प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शक शिबिरे व प्रशिक्षण शिबिरे घेतली जातात. त्यामध्ये उद्योग / सेवा यांकरिता मार्गदर्शन देणे, जागेसंबंधी आवश्यक तरतूदी, प्रकल्प अहवाल तयार करणे, निरनिराळे परवाने मिळविण्याच्या पध्दती विक्रीकरिता आवश्यक बाबी इत्यादीबाबत माहिती दिली जाते.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : अनु.जाती, अनु.जमाती (आदिवासी जनजाती क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेर ), सर्वसाधारण प्रवर्गासाठी.
योजनेच्या प्रमुख अटी :
 • 1.कमित कमी 7 वी पास / पदवी / पदविका/ आयटीआय प्रमाणपत्र.
 • 2.वयोमर्यादा 18 ते 50 वर्ष.
 • 3.अर्जदार कोणत्याही वित्त संस्थेचा थकबाकिदार नसावा.
आवश्यक कागदपत्रे : वरील अटींच्या अनुषंगाने..
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
 • उद्योजकता परिचय कार्यक्रम ( 1 दिवस, अनिवासी)
 • एक दिवसाच्या परिचय कार्यक्रमात व्यवसायाची निवड, उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, व्यवसाय व्यवस्थापन, शासनाच्या विविध संस्था व अर्थसहाय्य देणाऱ्या संस्था व त्यांचेमार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली जाते.
 • उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम (12 दिवस, निवासी)
 • सदर प्रशिक्षण कार्यक्रम 12 दिवसाचे, निवासी व भोजन व्यवस्थेसह आहे. उद्योजकता परिचय कार्यक्रमात निवडलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना उद्योगांशी संबंधित कलागुणांचा विकास व माहिती मिळण्याचा प्रशिक्षणात प्रामुख्याने समावेश आहे.
 • तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रम (15 दिवस ते 2 महिने, अनिवासी) :-
 • या प्रशिक्षण कार्यक्रमात उत्पादन/सेवा उद्योगांशी निगडीत तांत्रिक प्रशिक्षण देण्यात येते. हे प्रशिक्षण अनिवासी असून प्रशिक्षणार्थीस विद्यावेतन देण्यात येते.
अर्ज करण्याची पद्धत : जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाकडील विहित नमुन्यात
१० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : अर्ज प्राप्त झाल्यानंतर कार्यबल समितीने निवड केलेल्या अर्जदारास. प्रशिक्षण कार्यक्रमाच्या विषयास अनुसरून प्रशिक्षण कालावधी निश्चित केला जातो. प्रशिक्षण वर्गास किमान 30 लाभार्थ्यांची संख्या आवश्यक.
११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : पत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा उद्योग केंद्र कार्यालय
१२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: Online प्रक्रिया अद्याप सुरू नाही

Check Also

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव …

Leave a Reply