उमरेड

भारतातील महाराष्ट्र राज्याच्या नागपूर शहराच्या उमरेड या तहसिलीच्या गावी असलेला हा किल्ला आहे. या गावात दगडी तटबंदीची वेस आहे. या किल्ल्याचा प्रकार स्थळदुर्ग आहे.

लालसर पिवळ्या वालुकाश्मांनी ती बांधलेली आहे.या किल्ल्यास सात बुरुज आहेत. हत्ती अंबारीसह प्रवेश करु शकेल एवढे मोठे लाकडी प्रवेशद्वार होते. इ.स. १७व्या शतकात याचे बांधकाम झाले असावे. पुढे हा भोसले राजघराण्याच्या ताब्यात आला. याची फक्त तटबंदीच सध्या शिल्लक आहे. तेथे किल्ल्यासाठी वेगळी जलव्यवस्थाही होती. हा एक छोटा किल्ला होता.

admin

Leave a Reply

Next Post

गोंड राजाचा किल्ला

Fri May 3 , 2019
भारतातील महाराष्ट्र राज्याच्या नागपूर शहराच्या ’महाल’ या भागात असलेला हा किल्ला आहे. या किल्ल्याचे बांधकाम मजबुत होते. यासभोवताल पाण्याने भरलेले खंदक खोदण्यात आले होते. या किल्ल्यास उत्तरेच्या बाजुस एक दगडी कमान आहे. ते प्रवेशद्वार.या प्रवेशद्वारावर फारसी लिपीत कोरलेले आढळून येते. या द्वारातुन सुमारे ७० मीटर आत गेल्यावर एक लाकडाचे भव्य […]
WhatsApp chat
%d bloggers like this: