उस्मानाबाद जिल्हा 

उस्मानाबाद जिल्हा

हा महाराष्ट्रातील मराठवाड्यातला एक जिल्हा आहे. हैदराबादच्या 7 वा निजाम मीर उस्मान अली खान च्या सन्मानार्थ उस्मानाबादचे नाव देण्यात आले. जिल्हा मुख्यालय उस्मानाबाद शहर येथे आहे. जिल्ह्याचा बहुतेक भाग खडकाळ आहे. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७५१२ चौरस किलोमीटर आहे. त्यातील २४१ चौ.कि.मी भाग हा शहरी आहे. उस्मानाबाद जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १४,८६,५८६(इ.स.२००१) इतकी असून त्यातील १५.६९ % शहरी आहे. जिल्ह्यातील ‘तुळजापूर’ येथील ‘तुळजाभवानी’ मातेचे मंदिर प्रसिद्ध आहे.तसेच तुळजाभवानी माता ही शिवाजी महाराजांची कुलदैवत आहे.
उस्मानाबाद जिल्हा राज्याच्या दक्षिण भागात स्थित आहे.उस्मानाबाद जिल्हा हा मराठवाडयात त्याच्या नैर्ऋत्येला आहे. हा जिल्हा समुद्रसपाटीपासून ६०० मी. उंचीवर असून पूर्णपणे दख्खनच्या पठारात येतो. ह्या जिल्ह्यात मांजरा आणि तेरणा नद्यांची पात्रे येतात.उस्मानाबादच्या नैर्ऋत्येला सोलापूर जिल्हा, वायव्येला अहमदनगर जिल्हा, उत्तरेला बीड जिल्हा, पूर्वेला लातूर जिल्हा, व दक्षिणेला कर्नाटकातीलबिदर व गुलबर्गा हे जिल्हे आहेत.जिल्ह्याचा बहुतांश भाग खडकाळ तर उर्वरित भाग सपाट आहे.जिल्ह्याचा बहुतांश भाग बालाघाट नावाच्या लहान पर्वताने व्यापलेला आहे. भूम, वाशी, कळंब, उस्मानाबाद आणि तुळजापूर हे तालुके बालाघाटच्या रांगेत स्थित आहेत. गोदावरी आणि भीमा सारख्या मोठ्या नद्यांचा काही भाग जिल्ह्याच्या अंतर्गत येतो.जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७५१२.४ चौ.किमी आहे पैकी शहरी भागाचे क्षेत्रफळ २४१.४ चौ.किमी आहे(एकूण क्षेत्रफळाच्या ३.२१ %) आणि ग्रामीण भागाचे क्षेत्रफळ ७२७१.० चौ.किमी आहे (एकूण क्षेत्रफळाच्या ९६.७९ %)
जिल्हा बालाघाट डोंगररांगांनी वेढला असून हवामान मुख्यत: कोरडे आहे. पावसाळ्याचा कालावधी साधारणपणे जूनच्या मध्यापासून सप्टेंबर अखेरपर्यंत असतो. सरासरी पर्जन्यमान ६०० ते ७०० मिलिमीटर. आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबर हवामान दमटसर असते. डिसेंबर-जानेवारी शीत हवामानाचा काळखंड असतो. फेब्रुवारीपासून जूनपर्यंत हवामान अधिकाधिक कोरडे आणि तापमान उष्ण होत जाते. उन्हाळ्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचे तापमान हे मराठवाड्यामधील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी असते. ज्वारी, सूर्यफूल, हायब्रीड ज्वारी, तुरी, ऊस, कापूस, गहू आणि हरभरा ही मुख्य पिके आहेत

उस्मानाबाद हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहमतुल्ला आले दर्गा शहरातील मध्य भागी आहे दर वर्षी येथे मोठी यात्रा भरते लाखो भाविक पर राज्यातुचन व विदेशातुन ऊर्सा साठी येतात

  • तुळजापूर हे देशातील प्रसिद्ध देवस्थान आहे. तुळजाभवानी हे छत्रपती शिवाजी यांचे कुलदैवत होते. हे भवानीमातेचे मंदिर उस्मानाबादपासून २५ कि.मीवर., सोलापूरपासून ४१ तर ते हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्ग येथून ४० कि.मी.वर आहे.
  • कळंब हे जिल्ह्यातील व्यावसायिकदृष्टया महत्त्वाचे ठिकाण आहे. ते मांजरा नदीच्या काठावर वसलेले आहे. कळंबपासून २० कि.मी.वर येरमाळा येथे येडेश्वरी देवीचे मंदिर आहे.
  • परांडा हे ऐतिहासिक ठिकाण किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे.
  • रामलिंग मंदिर हे भगवान शिवशंकराचे प्रसिद्ध मंदिर आहे. ते उस्मानाबाद पासून 20 KM च्या अंतरावर सोलापुर औरंगाबाद या रोडवरील येडशी या गावात आहे.येथे दुर्गा देवीचे पुरातन मंदिर आहे.श्रावन महिन्यात येथे मोठ्या प्रमाणावर भक्तगण येतात.तसेच भरपूर पाउस पडल्यावर येथील धबधबा हा आकर्षन ठरू शकते.तसेच या प्रदेश हा डोंगराल प्रदेश आहे तसेच येथे मोठ्या प्रमाणावर वनराई आहे.त्यामुले या प्रदेशास रामलिंग अभयारण्य म्हणून घोषित केले आहे.
  • इतर पर्यटनस्थळे- संत गोरोबा मंदिर, धाराशिव लेणी, नळदुर्ग किल्ला, कुंथलगिरी येथील जैन मंदिर,श्री दत्तमंदिर, तसेच नळदुर्ग येथील नर-मादी धबधबा प्रसिद्ध आहे.

तसेच तेर (ता. उस्मानाबाद) येथील पुराणवस्तुसंग्रहालय प्रसिद्ध आहे येथे उत्खननात सापडलेल्या अनेक प्राचीन वस्तू आहेत उदा. तरंगणारी वीट

उस्मानाबाद येथील हातलाई देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे.उस्मानाबाद जिल्हा शेळ्यांसाठी प्रसिद्ध आहे.

Check Also

कोल्हापूर जिल्हा

कोल्हापूर जिल्हा

कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. कोल्हापूर ऐतिहासिक महालक्ष्मी मंदिर, कोल्हापुरी चपला, …

नाशिक जिल्हा

नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा 18.33 आणि 20.53 डिग्री उत्तर अक्षांश आणि 73.16 डिग्री आणि 75.16 …

नंदुरबार जिल्हा

नंदुरबार जिल्हा

नंदुरबार जिल्हा नंदुरबार भारतातील महाराष्ट्र राज्याच्या खान्देश विभागातील एक जिल्हा आहे आणि तालुकाचे मुख्यालय ठिकाण …

जळगाव जिल्हा

जळगाव जिल्हा

जळगाव जिल्हा विशेष – केळ्यांचे आगर ही जळगाव जिल्ह्याची सर्वांत महत्त्वाची ओळख होय. उत्तर महाराष्ट्रातील …

Leave a Reply

error: माफ करा ही माहिती कॉपीराइट प्रोटेक्टेड आहे..