एकलव्य आर्थिक सहाय्य योजना

एकलव्य आर्थिक सहाय्य योजना

अ.क्र. योजना सविस्तर माहिती
योजनेचे नाव : एकलव्य आर्थिक सहाय्य योजना
योजने बद्दलचा शासन निर्णय : शासन निर्णय एससीएच-1095/31/96/मशि-4, दि.24.01.1996 अन्वये राज्य शासनाने सन 1995-96 या शैक्षणिक वर्षापासून सुरु कण्यात आलेली आहे.
योजनेचा प्रकार : राज्य शासनकडून ऑफलाईन पध्दतीने सन 1995-96 या शैक्षणिक वर्षापासून एकलव्य आर्थिक सहाय्य योजना सुरु केली आहे, होतकरु व गरीब विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी शासनाने ही योजना सुरु केलेली आहे.
योजनेचा उद्देश : होतकरु व गरीब विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी सुरु केली आहे.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्व प्रवर्गासाठी ही योजना लागू आहे.
योजनेच्या प्रमुख अटी :
  • 1) विधी, वाणिज्य व कला शाखेमध्ये किमान 60 टक्के व विज्ञान शाखेकरिता किमान 70 टक्के पदवी अभ्यासक्रमामध्ये गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
  • 2) लाभार्थ्यांचे पालकांचे वार्षिक उत्पन्न रु . 75,000/- पेक्षा कमी असावे.
  • 3) सदर विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • 4)संबंधित लाभार्थी कुठेही पूर्ण किंवा अर्धवेळ नोकरी करणारा नसावा.
आवश्यक कागदपत्रे :
  • 1. पदवी परीक्षा उत्तीर्ण असलेबाबतचे प्रमाणपत्र.
  • 2. पालकाचे वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र.
  • 3. बँक खाते पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत.
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : पदव्युत्तरस्तर (2 वर्ष) साठी – प्रतिवर्ष 5000/- सदर रक्कम ही भारतीय स्टेट बँक ॲाफ ईडिया पुणे कोषागार शाखा,पुणे यांचामार्फत विद्यार्थ्यांचे बँक खातेवर थेट (NFT) जमा करण्यात येते.
अर्ज करण्याची पद्धत : नवीनमंजूरी/नुतनिकरणसाठी ऑफलाईन अर्ज स्विकारण्यात येतात. ज्या विद्यार्थ्यांस नवीन (Fresh) शिष्यवृत्ती मंजूर झालेली आहे अशा विद्यार्थ्यांना पुढील वर्षाचे अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेनंतर नुतनीकरणाचा अर्ज करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयामार्फत संचालनालयास सादर करणे आवश्यक आहे.
१० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयामार्फत संचालनालयास माहे सप्टेंबर पर्यंत येने आवश्क आहे. सदर अर्जाची छाननी होऊन शिष्यवृत्तीची रक्कम माहे एप्रिल मध्ये विद्यार्थ्यांना थेट त्यांचे खातेवर वितरीत होते.
११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : उच्च शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत, ससून सर्वोपचार रुग्णालयाजवळ, पुणे स्टेशन, पुणे -411 001.
१२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: सदर योजना ऑफलाईन पध्दतीने राबविण्यात येते.

admin

Leave a Reply

Next Post

गुणवान विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य.

Sat May 4 , 2019
अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव : गुणवान विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य. २ योजने बद्दलचा शासन निर्णय : शासन निर्णय शिक्षण व सेवायोजन विभाग, एएफईडी 1083/181635(2317) साशि-5 दि. 17.05.1984 नूसार गुणवान विद्यार्थ्यांकरिता आर्थिक सहाय्य देण्याची योजना सन 1984-85 च्या शैक्षणिक वर्षापासून कार्यान्वित करण्यात आली आहे.. ३ योजनेचा प्रकार : माध्यमिक […]
WhatsApp chat
%d bloggers like this: