loading...

एस. एस. सी झाल्यावर तुम्ही काय करणार आहात हे तुमच्या वडिलांना कळवा

२०७, अश्वमेध सोसा.,
जुना आग्रा रोड,
पंचवटी , नाशिक – ४२२००२
दि . २५ जुन २०१८

loading...

तीर्थरूप बाबांना,
शि. सा. नमस्कार.

बाबा तुमचे पत्र मिळाले. वाचून आनंद झाला. त्यात तुम्ही माझ्या एस. एस. सी परीक्षेत मिळालेल्या गुणांचे खूप कौतुक केले म्हणून छान वाटले. तुम्ही निकालाच्या दिवशी इकडे हवे होता, पण तुम्हाला तुमच्या ऑफिसच्या कामामुळे पुण्याला जावे लागले. निकाल लागल्यावर आमच्या शाळेत पुढच्या करिअर विषयी एक शिबीर झाले. त्यातुन आम्हाला पुढे काय करावे याची प्रेरणा मिळाली. बाबा तुम्हाला माहितीच आहे, मला लहानपणापासूनच डॉकटर व्हायचे होते. आणि मला एस. एस. परीक्षेत ९२% ही मिळाले , म्हणून मी सायन्स साइड घ्यावी असे मला वाटते. पुढचा अभ्यासही मी एवढ्याच मेहनतीने करीन याचे तुम्हाला आश्वासन देतो.

तरी बाबा तुमचे माझ्या करिअर विषयी काय मत आहे हे पत्राने कळविणे, कारण तुम्ही येण्याच्या आधीच प्रवेश प्रक्रिया सुरु होतील. म्हणून पत्रास उत्तर लवकर देणे.

तुमचा लाडका,
अतुल

Advertisement

admin

Leave a Reply

Next Post

तुमच्या हातून घडलेल्या चुकीबद्दल माफी मागणारे पत्र तुमच्या वर्गशिक्षकांना लिहा

Tue Apr 30 , 2019
कु. योगेश जोग, इयत्ता ७ वी / ब श्रीराम विद्यालय पंचवटी, नाशिक – ४२२००४ दि . ८ जुलै २०१८ loading... प्रति, माननीय वर्गशिक्षक, इयत्ता ७ वी / ब श्रीराम विद्यालय पंचवटी, नाशिक – ४२२००४ महोदय, सादर प्रणाम, मी आपल्या वर्गात शिकणारा एक विद्यार्थी आहे. काल वर्गात झालेल्या प्रकाराबद्दल आमच्या ग्रुपकडून […]
loading...
WhatsApp chat
%d bloggers like this: