कंधारचा किल्ला

कंधारचा किल्ला हा महाराष्ट्राच्या नांदेड जिल्हयातील कंधार या तालुक्याच्या गावी असलेला एक भुईकोट किल्ला आहे. किल्ल्याचे क्षेत्रफळ २४ किलोमीटर इतके असून, चहु बांजूनी खंदक आहे.इतिहासया किल्ल्याचे बांधकाम मालखेडचा राष्ट्रकूट राजा तिसरा कृष्ण याने सुरू केले होते. नंतरच्या काळात हा किल्ला जिंकणार्या वेगवेगळ्या राजांनी या किल्ल्याच्या बांधकामात भर घालण्याचे काम केले.

इ.स. १४०३ साली तुघलकाने वारंगळ जिंकल्यानंतर कंधार त्याच्या अधिपत्याखाली आले. तुघलकाने याठिकाणी नसरत सुलतान याची कारभारी म्हणून नेमणूक केली. परंतु नसरत सुलतानाने येथे अयशस्वी उठाव केला. त्याच्यानंतर काही काळ खतलब व खतलबानंतर इ.स. १३१७ ते इ.स. १३४० या कालखंडात मलिक सैफद्दौला हा कंधारचा कारभारी राहिला. या किल्ल्यातील मछली दरवाजाच्या डाव्या बाजूला असलेल्या शिलालेखात याचे नाव आहे.

हा शिलालेख हिजरी ७४४ म्हणजेच इ.स. १३३६ सालातील आहे. इब्राहीम आदिलशहा याच्या काळातील अंदाजे इ.स. १५९०च्या सुमाराचा एक लेख शाही बुरूजावर आहे तर किल्ल्यातीलच मुहम्मदी मस्जिदीवर इब्राहीम आदिलशहाचा इ.स. १६०५ सालातील लेख आहे. कंधारच्या किल्ल्यातील धन बुरूज, रंगीन दरवाजा व त्याशेजारील इमारती इब्राहीम आदीलशहा याने बांधलेल्या आहेत. मलिक अंबर या प्रसिद्ध कारभार्यानेही या किल्ल्यातील अनेक इमारती पूर्ण केल्या व बांधल्या.

मुहम्मदी मशिदीवर त्याचा शिलालेख आहे. मुर्तजा निजामाच्या कारकीर्दीत पोलाद खान व घोरी खान यांनी तटाच्या भिंती दुरूस्त करुन बुरूज बांधले. औरंगजेबाच्या आदेशावरून मिर्झा हमीदुद्दीन खान याने किल्ल्यात सुंदर बगीचा तयार केला होता. शाह बुरूजावर असलेल्या लेखात या बागेचा उल्लेख बाग-ए-रश्के कश्मीर असा आहे.

admin

Leave a Reply

Next Post

नंदगिरी किल्ला

Thu May 2 , 2019
नांदेड रेल्वेस्थानकापासून ४ कि.मी. अंतरावर कळंबच्या राजाने बांधलेला नांदेडचा नंदगिरी किल्ला आहे.संथ वाहणार्या गोदावरीच्या विस्तीर्ण पात्राच्या शेजारी दिमाखदार तटबंदीचे कवच अंगावर घेऊन तीनशे वर्षांपूर्वींचा इतिहास सांगणारा नंदगिरी किल्ला कात टाकत आहे.गोदावरी नदीच्या काठावर शहराच्या दक्षिणेला जुन्या नांदेडात उत्तर दिशेला किल्ल्याचे प्रवेशद्वार असून, नदीच्या मोठय़ा वळणावर असलेला हा किल्ला लांबूनच आपली […]
WhatsApp chat
%d bloggers like this: