Amazon Big Sell

कपालभाती प्राणायाम

कपाल = कपाळ; भाती= ओजस्वी; प्राणायाम = श्र्वोच्छ्वासाचे तंत्र,
ही अशी प्रक्रिया आहे ज्याने वजनच कमी होते असं नाही तर पूर्ण (शारीरिक व मानसिक) प्रणाली सुद॒धा संतुलित ठेवते. कपालभातीचं महत्व समजावून सांगताना डॉ. सेजल शहा (ज्या श्री श्री योग प्रशिक्षकही आहेत) म्हणतात : आपल्या शरीरातील ८०% विषांत द्रव्ये ही श्र्वासावाटे बाहेर टाकली जातात. कपालभातीचा सराव करते वेळी शरीरातील सर्व संस्थांची सफाई / प्रक्षालन / शोधन होते. आणि ओजस्वी कपाळ हे उत्तम आरोग्याचं प्रतिकच म्हणता येईल. कपालभातीचा शब्दशः अर्थ ओजस्वी कपाळ असा होतो आणि या प्राणायामच्या नियमित सरावाने नेमके हेच होते. ही चमक बाह्यच नसून बुद्धीला तल्लख व शुद्ध करणारी आहे.

कपालभाती प्राणायाम कसा करावा?

१. सुखासनात बसावे, पाठीचा कणा ताठ ठेवावा व हाताचे तळवे आकाशाच्या दिशेला उघडून गुडघ्यांवर ठेवावेत.

२. श्वास घ्यावा.

३. श्वास सोडता सोडता पोट आत घ्यावं. नाभीलाही पाठीच्या कण्याकडे ओढून घ्यावे. सहज शक्य होईल तेवढेच करावे. पोटाच्या स्नायूंची हालचाल जाणवावी म्हणून उजवा हात नाभीवर ठेवावा व नाभी आतल्या बाजूस ओढून घ्यावी.

४. जसं ओटीपोट आणि नाभीकडचा भाग सैल सोडाल, फुफुसात हवा आपणहून शिरेल.
५. अशा प्रकारे २० वेळा केल्याने एक चरण पूर्ण होते.

६. एक चरण पूर्ण झाल्यानंतर डोळे बंद ठेउन शरीरां मध्ये होणाऱ्या संवेदनांकडे लक्ष द्यावे.

७. अशाच प्रकारे अजून २ चरणं पूर्ण करावी.

कपालभाती कोणी करू नये?
श्वास बाहेर सोडण्यावर भर असावा. श्वास घेण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज नाही. पोटाचे स्नायू सैल सोडल्याबरोबर आपणहून श्वास आत घेतला जातो. श्वास बाहेर सोडण्यावरच लक्ष असू द्या. कपालभाती शिकण्यासाठी एखाद्या अनुभवी श्री श्री योग प्रशिक्ष्काचे मार्गदर्शन घ्यावे.त्यानंतर घरीच ह्याचा सराव करू शकाल.
• हृदयविकार असेल, पेस-मेकर बसवला असेल किंवा स्टेन्ट्स बसवले असतील, स्लिप-डिस्क मुळे पाठदुखीचा त्रास असेल, पोटाचे ऑपरेशन झालेले असेल, फेफरे येत असेल किंवा हर्नियाचा त्रास असेल तर अशा व्यक्तीने कपालभाती करू नये.
• गरोदर महिलांनी किंवा मासिक पाळी चालू असल्यास काल्पालभाती करू नये कारण ह्या प्रकियेत ओटीपोटाचे स्नायू पिळवटून निघतात.
• पोटाचे स्नायू उत्तेजित होतात ज्याचा लाभ मधुमेहींना होतो.

• मज्जासंस्था उर्जित होते व मेंदूच्या पेशींना चालना मिळते.

• उच्च रक्तदाब आणि हृदयविकार असलेल्या व्यक्तीने योग तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली हा प्राणायाम करावा.

कपाल भातीने होणारे लाभ:

• चयापचयाची (म्हणजेच खाल्लेल्या अन्नाचे उर्जेत रुपांतर करण्याची गती) वाढते ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
• पचनसंस्थेची कार्यक्षमता वाढते, पोशाक तत्वांचं शरीरात परिपाक जलद गतीने होतो.
• शरीरातील सूक्ष्म नाड्यांची शुद्धी होते.
• मन शांत हलके होते.
• पोट सुडौल राहते.

• रक्ताभिसरण वाढते आणि चेहऱ्याची कांती वाढते.

Asha Transcription

Check Also

शंखमुद्रा

शंखमुद्रा शंखमुद्रा कृति – प्रथम डाव्या हाताचा अंगठा उजव्या हाताने तळहातावर ठेवावा. – उजव्या हाताचा …

Leave a Reply