करिअर विषयक साहित्य, अभ्यासिका व वेबसाईट विकास योजना

अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
योजनेचे नाव : करिअर विषयक साहित्य, अभ्यासिका व वेबसाईट विकास योजना
योजने बद्दलचा शासन निर्णय :
  • रोजगार व स्वयंरोजगार विभाग, शासन निर्णय रोस्वरो२००७/प्र.क्र.३०/रोस्वरो१ दि.३ जानेवारी, २००८
योजनेचा प्रकार : योजनांतर्गत योजना
योजनेचा उद्देश :
  • सध्याच्या जागतिकरणाच्या काळात रोजगाराच्या संधींचे स्वरुप बदलले आहे. रोजगाराच्या नवनवीन संधीबाबत माहिती नसल्याने तथा त्यास अनुरुन पात्रता धारण करीत नसल्याने मोठया संखेने राज्यातील विशेषतः ग्रामीण भागातील उमेदवार हे माहिती व मार्गदर्शनाभावी रोजगारापासून वंचित राहत आहेत. यामुळे, रोजगारांच्या संधीची माहिती व मार्गदर्शन बेरोजगार उमेदवारांना उपलब्ध होणे गरजेचे आहे. ही वस्तुस्थिती विचारात घेऊन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात येणाया बेरोजगार उमेदवारासाठी करिअर ग्रंथालय सष्य अभ्यासिका सुरू करून यामध्ये स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तके, मासिके, करिअर मार्गदर्शनावरील पुस्तके, वर्तमानपत्रे उपलब्ध करून मोफत अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध करुन देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्व प्रवर्गासाठी
योजनेच्या प्रमुख अटी : उमेदवाराने जिल्हयाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे : नोंदणी कार्ड
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
  • 1) ग्रंथालयामधून विविध व्यवसाय मार्गदर्शन साहित्य, स्पर्धा परिक्षांची माहिती देणारी मासिके, पुस्तके, वृत्तपत्रे इ. उपलब्ध करुन दिले जातात.
  • 2) अभ्यासिकेमध्ये नियमित बसण्याची व्यवस्था उपलब्ध करण्यात येते.
  • 3) रोजगार व स्वयंरोजगाराच्या नवीन नवीन संधीची माहिती उपलब्ध करुन देण्यात येते.
अर्ज करण्याची पद्धत : ग्रंथालय व अभ्यासिकेचा लाभ घेण्यासाठी संबधित कार्यालय प्रमुखाना विनंती अर्ज देणे.
१० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : अर्ज केल्यानंतर अंदाजे १५ दिवसंापर्यंत
११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रे/ विद्यापीठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रे/ आदिवासी उमेदवारांसाठी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन व प्रशिक्षण केंद्रे
१२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: सुविधा उपलब्ध नाही

Check Also

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव …

Leave a Reply