कारागीर रोजगार हमी योजना

अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
योजनेचे नाव : कारागीर रोजगार हमी योजना
योजने बद्दलचा शासन निर्णय : शसन निर्णय दिनांक २३ ऑगस्ट १९७२ अन्वये संपूण राज्यात तालुका पातळीवर बलुतेआर संस्थांची स्थापना करून कारागीर रोजगार हमी योजना कार्यान्वीत करण्यात आली आहे.
योजनेचा प्रकार : संकलित कर्ज योजना.
योजनेचा उद्देश : राज्यातील बलुतेदार /ग्रामीण कारागीर यांना अर्थसहाय्य मिळवून देणे.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : ग्रामीण व क वर्ग नगर परिषद हदृीतील ग्रामोद्योग व्यवसाय करणारा अथवा नव्यवने उद्योग ,व्यवसाय करू इच्छिणारा.
योजनेच्या प्रमुख अटी : ग्रामोद्योग /व्यवसाय करणारा अथवा नव्याने करू इच्छिणारा.
आवश्यक कागदपत्रे :
  • १) ग्रामोद्योग करीत असलेबाबतचा संबंधीत ग्रामपंचायत /नगरपालिकेचा दाखला.
  • २) रेशन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला.
  • ३) अनुभवाचा दाखला / प्रशिक्षणाचा दाखला, जातीचा दाखला (पारंपारीक व्यवसाय करणाऱ्या)
  • ४) हत्यारे अवजारे/ मशीनरी दरपत्रक
  • ५) व्यवसायाच्या जागेचा उतारा.
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : नाबार्ड रिफायनान्स योजनेंतर्गत राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकामार्फत कंपोझिट स्वरूपात कर्ज रूपये ५० हजार पर्यंत दिले जाते.
अर्ज करण्याची पद्धत : तालुकास्तरावरील बलुतेदार संस्थांकडे कर्ज मागणी प्रस्ताव सादर केले जातात.
१० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : २ ते ३ महिने.
११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :
  • १) तालुका स्तरावरील बलुतेदार /ग्रामोद्योग संस्था सर्व जिल्हयातील.
  • २) महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ कार्यालय.
१२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: उपलब्ध नाही.

Check Also

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव …

Leave a Reply