अ.क्र. | योजना | सविस्तर माहिती |
---|---|---|
१ | योजनेचे नाव : | केंद्रशासन पुरस्कृत अपंग विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना. |
२ | योजने बद्दलचा शासन निर्णय : | सदर योजनेबाबतचा राज्य शासनाचा शासन निर्णय निर्गमित झालेला नाही. शासनाच्या दिनांक 26 फेब्रुवारी 2016 च्या पत्रान्वये सदर ऑनलाईन शिष्यवृत्ती योजनेच्या अंमलबजावणीसाठी उच्च शिक्षण उपविभागासाठी संचालक,उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. |
३ | योजनेचा प्रकार : | केंद्रशासनाच्या विकलांगजन सशक्तीकरण विभागामार्फत अपंग विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. सदर योजनेची ऑनलाईन पध्दतीने या संचालनालयामार्फत अंमलबजावणी मार्च 2016 मध्ये करण्यात आलेली आहे. सदर शिष्यवृत्ती 11, 12 वी, पदवी अभ्यासक्रम तसेच पदव्युत्तर डीग्री, डिप्लोमा व सर्टिफिकेट या अभ्यासक्रमासाठी देण्यात येते |
४ | योजनेचा उद्देश : | अपंग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे. |
५ | योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : | सर्व प्रवर्गांसाठी. |
६ | योजनेच्या प्रमुख अटी : |
|
७ | आवश्यक कागदपत्रे : |
|
८ | दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : | सदर रक्कम ही विकलांगजन सशक्तीकरण विभाग नवी दिल्ली यांचमार्फत विद्यार्थ्यांचे बँक खातेवर थेट जमा करण्यात येते.श्अद्यापपर्यंत शिष्यवृत्ती मंजूर झालेल्या विद्यार्थ्यांची यादी या संचालनालयास प्राप्त झालेली नाही. या संचालनालयाकडून या योजनेची कार्यवाही सन 2015-16 मध्ये पहिल्यांदाच करण्यात आलेली आहे. |
९ | अर्ज करण्याची पद्धत : |
नवीन मंजूरीसाठी तसेच नुतनीकरणासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांस नवीन (Fresh) शिष्यवृत्ती मंजूर झालेली आहे अशा विद्यार्थ्यांनी पुढील वर्षाचे अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेनंतर नुतनीकरणाचा अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरणे आवश्यक आहे. |
१० | अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : | अर्ज भरण्याची प्रक्रिया साधारणपणे माहे जुलै/ऑगस्ट मध्ये सुरु होते. सदर अर्जाची विविध स्तरांवरील छाननी होऊन शिष्यवृत्तीची रक्कम माहे मार्च/एप्रिल मध्ये विद्यार्थ्यांना थेट त्यांचे खातेवर वितरीत होते. (कालावधी : जुलै/ऑगस्ट ते मार्च/एप्रिल – 8 ते 9 महिने) |
११ | संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : | उच्च शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत, ससून सर्वोपचार रुग्णालयाजवळ, पुणे स्टेशन, पुणे -411 001. |
१२ | Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: | www.scholarships.gov.in |
Check Also
इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण
इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव …