केंद्रशासन पुरस्कृत अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना

अ.क्र. योजना सविस्तर माहिती
योजनेचे नाव : केंद्रशासन पुरस्कृत अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना
योजने बद्दलचा शासन निर्णय : उच्च व तंत्रशिक्षण विभाग, शा.नि. क्र. संकीर्ण 2007/(542/07)/तांशि-1 दिनांक 21.1.2008
योजनेचा प्रकार : केंद्रशासनाकडून राज्यातील मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, बौध्द, पारशी व जैन या अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सन 2007-08 पासून राबविण्यात येते. सदर शिष्यवृत्ती 11 वी ते पी.एचडी., व्यावसायिक(डी.एड्, बी.एड्, एम.एड्, आय.टी.आय.) सर्व डिप्लोमा व अकरावी/बारावी स्तरावरील एम.सी.व्ही.सी.अभ्यासक्रम या अभ्यासक्रमांना देण्यात येते. (तंत्र शिक्षण विभागातील व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम यादीतील अभ्यासक्रम सोडून)
योजनेचा उद्देश : अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी (मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, बौध्द, पारशी व जैन)
योजनेच्या प्रमुख अटी :
 • 1. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
 • 2. मागील वार्षिक परीक्षेत किमान 50 टक्के गुण घेवून उत्तीर्ण झालेला असावा.
 • 3. अर्जदार इतर कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेचा / स्टायपेंड लाभार्थी नसावा.
 • 4. नुतनीकरणसाठी विद्यार्थ्याने पुढील वर्गात प्रवेश घेतलेला असावा.
 • 5. अर्जदाराच्या पालकांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न मर्यादा रू . 2.00 लाख इतकी आहे.
 • 6 .एका कुटूंबातील फक्त 2 अपत्यांनांच सदर योजनेचा लाभ घेता येईल.
 • 7. विद्यार्थ्याने कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये स्वत:चे खाते उघडणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे :
 • 1. विद्यार्थ्याचा फोटो
 • 2. मागिल वर्षाची गुणपत्रिकेची प्रत.
 • 3. पालकाचे वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र.
 • 4. महाविद्यालयास चालु वर्षाची फी भरल्याची पावती / रिसीप्ट.
 • 5. बँक खाते पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत.
 • 6. विद्यार्थ्याचे अल्पसंख्यांक असल्याबाबतचे स्वयंघोषित प्रमाणपत्र.
 • 7. महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र.
 • 8. आधार कार्ड छायांकित प्रत (असल्यास).
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
 • रु.2000/- ते 15000/-पर्यंत (अभ्यासक्रम निहाय)
 • सदर रक्कम ही अल्पसंख्यांक कार्य मंत्रालय, नवी दिल्ली यांचेतर्फे विद्यार्थ्यांचे बँक खातेवर थेट (DBT) जमा करण्यात येते.
अर्ज करण्याची पद्धत :

  नवीन मंजूरीसाठी तसेच नुतनीकरणासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांस नवीन (Fresh) शिष्यवृत्ती मंजूर झालेली आहे अशा विद्यार्थ्यांनी पुढील वर्षाचे अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेनंतर नुतनीकरणाचा अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरणे आवश्यक आहे.

  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : अर्ज भरण्याची प्रक्रिया साधारणपणे माहे जुलै/ऑगस्ट मध्ये सुरु होते. सदर अर्जाची विविध स्तरांवरील छाननी होऊन शिष्यवृत्तीची रक्कम माहे मार्च/एप्रिल मध्ये विद्यार्थ्यांना थेट त्यांचे खातेवर वितरीत होते. (कालावधी : जुलै/ऑगस्ट ते मार्च/एप्रिल – 8 ते 9 महिने)
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : उच्च शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत, ससून सर्वोपचार रुग्णालयाजवळ, पुणे स्टेशन, पुणे -411 001.
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: www.scholarships.gov.in

  Check Also

  इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण

  इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव …

  Leave a Reply