Amazon Big Sell

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत निवड होणाऱ्या अखिल भारतीय प्रशासकीय सेवामध्ये महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांचे प्रमाण वाढावे यासाठी गुणवत्ताधारक विशेष शिष्यवृत्ती योजना

अ.क्र. योजना सविस्तर माहिती
योजनेचे नाव : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत निवड होणाऱ्या अखिल भारतीय प्रशासकीय सेवामध्ये महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांचे प्रमाण वाढावे यासाठी गुणवत्ताधारक विशेष शिष्यवृत्ती योजना
योजने बद्दलचा शासन निर्णय : प्रीआय-5415/ प्र.क्र 192/ मशि-2 दिनांक 16.04.2016
योजनेचा प्रकार : केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परिक्षा उत्तिर्ण झालेल्या उमेवारांना मुलाखतीसाठी प्रशिक्षणासाठी अर्थसाहय्य देणे बाबत.
योजनेचा उद्देश : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत निवड होणाऱ्या अखिल भारतीय प्रशासकीय सेवामध्ये महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांचे प्रमाण वाढावे यासाठी गुणवत्ताधारक विशेष शिष्यवृत्ती व प्रशिक्षणासाठी अर्थसाय्य देणे
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परिक्षा उत्तिर्ण होणारे सर्व प्रर्वगातील उमेदवार
योजनेच्या प्रमुख अटी :
  • 1. सदर शिष्यवृत्तीकरीता दिल्ली स्थीत नामाकिंत खाजगी प्रशिक्षण संस्थापैकी शासनाने निवड केलेल्या तीन संस्थापैकी एका संस्थेमध्ये प्रवेश घेण्याची मुभा पात्र उमेदवाराला देण्यात येईल.
  • 2. शिष्यवृत्तीसाठी पात्र उमेदवारास प्रशिक्षण घेतल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाची संबंधित परिक्षा देणे बंधनकारक असेल अन्यथा त्या शिष्यवृत्तीची संपुर्ण रक्कम एकरकमी शासनास परत करण्यात येईल. अशा आसयाचे बंधपत्र देण आवश्यक राहील.
  • 3. सदरहु उमेदवारांनी संचालक, राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई यांच्याशी संपर्कात राहुन मासिक अहवाल सादर करणे बंधनकारक राहील.
आवश्यक कागदपत्रे :
  • 1. रहिवासी प्रमाणपत्र
  • 2. उत्पनाचा दाखला
  • 3. पदवी परिक्षा प्रमाणपत्र
  • 4. त्या वर्षीच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची गुनपत्रिका
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : सदर शिष्यवृत्तीचालाभ प्रत्येक उमदेवारांना दिल्ली येथील त्याच्या प्रशिक्षण कालावधीसाठी रुपये 10,000/- प्रतिमहा निर्वाह भत्ता देण्यात येईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफ लाईन पध्दतीने
१० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : 60 दिवस
११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संचालक, राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, हजारी मल सोमाणी मार्ग, मुंबई
१२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
Asha Transcription

Check Also

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव …

Leave a Reply