केंद्र पुरस्कृत TUF योजनेशी निगडीत विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील नवीन वस्त्रोद्योग घटकांना 10% भांडवली अनुदान

अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
योजनेचे नाव : केंद्र पुरस्कृत TUF योजनेशी निगडीत विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील नवीन वस्त्रोद्योग घटकांना 10% भांडवली अनुदान
योजने बद्दलचा शासन निर्णय : शासन निर्णय क्र. धोरण 2012/प्र.क्र. 2 /टेक्स-2, दि. 1 मार्च,2012
योजनेचा प्रकार : ऐच्छिक
योजनेचा उद्देश : विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र या राज्यातील कापूस उत्पादक विभागात कापसावर आधारित वस्त्रोद्योगाला मोठया प्रमाणात चालना देणे. व जास्तीत जास्त कापसाची प्रक्रीया राज्यात व्हावी याकरीता राज्यातील मागास भागात जास्त गुंतवणूक आकर्षित करणेसाठी या भागातील वस्त्रोद्योग घटकांना बॅंकेमार्फत घेण्यात आलेल्या टफ अंतर्गत पात्र दिर्घ मुदती कर्जाच्या 10% भांडवली अनुदान.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : दि.1 मार्च,2012 ते दि. 31 मार्च, 2017 या कालावधीत केंद्र पुरस्कृत TUFS योजनेअंतर्गत मंजूर होणारे दिर्घ मुदती कर्जमंजूर झालेले विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रकल्प.
योजनेच्या प्रमुख अटी :
  • दि.1 मार्च,2012 ते दि. 31 मार्च, 2017 या कालावधीत केंद्र पुरस्कृत TUFS योजनेअंतर्गत मंजूर होणारे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रकल्प.
  • दि.1.3.2012 रोजी किंवा त्यानंतर दि. 20/02/2014 पुर्वी वित्तीय संस्थांनी कर्ज मंजूर केलेल्या प्रकल्पांना वस्त्र आयुक्त, भारत सरकार यांच्याकडून UID क्रमांक प्राप्त करुन घेणे आवश्यक
  • दि. 21/02/2014 रोजी किंवा त्यानंतर वित्तीय संस्थांनी कर्ज पुरवठा केलेल्या प्रकल्पांना केंद्र पुरस्कृत TUFS अंतर्गत UID क्र. प्राप्त करुन घेण्याची अट लागू नाही.
आवश्यक कागदपत्रे : सदर योजना हि बॅंक/वित्तिय संस्था यांचेमार्फत केंद्र पुरस्कृत टफ योजनेच्या धर्तीवर राबविण्यात येते. योजने बाबतच्या कागदपत्रांची पुर्तता बॅंकेमार्फत केली जाते. शासन निर्णय दिनांक 1 मार्च 2012 मध्ये नमूद केलेप्रमाणे कागदपत्रे बँकेमार्फत सादर करणे आवश्यक.
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : दि.1 मार्च,2012 ते दि. 31 मार्च, 2017 या कालावधीत केंद्र पुरस्कृत TUFS योजनेअंतर्गत मंजूर होणारे दिर्घ मुदती कर्जमंजूर झालेले विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रकल्पांना पात्र दिर्घ मुदती कर्जाच्या 10 टक्के भांडवली अनुदान.
अर्ज करण्याची पद्धत : बॅंकेमार्फत ऑनलाईन
१० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : एक महिना
११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :
  • कार्यासन टेक्स-5, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, नवीन प्रशासन इमारत, 14 वा माळा,मंत्रालय,मुंबई-400032 Email- texpolicy@gmail.com ;
  • दुरध्वनी 022-22026805
१२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: www.mahatextile.maharashtra.gov.in

Check Also

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव …

5 comments

  1. Pingback: watch now

  2. Pingback: poker99

  3. Pingback: 안전카지노

  4. Pingback: SEO

  5. Pingback: cross borders all weather

Leave a Reply