कोकण

कोकण

भारताचा कोकण म्हनला कि आपल्या सगळ्यांसमोर उभारतो तो स्वछंद सागरी किनारा . पश्विम किनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री पर्वतरांग यांच्या मधे असलेला भूमीचा पट्टा महाराष्ट्रात व गोव्यात कोकण म्हणून ओळखला जातो. याच पट्ट्याला दक्षिणेत, म्हणजे कर्नाटक व केरळ मध्ये मलबार किनारा म्हणून ओळखतात. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. माडांच्या राया, आंबे, सुपारी, केळीच्या बागा, फणस, काजू, कोकमाची झाडं आणि डोंगर उतारांवर केलेली भात शेती… असा निसर्गाचा वरद हस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही या कोकण पट्ट्यातच स्थित आहे.

इतिहास

प्राचीन व पौराणिक

पौराणिक कथेनुसार कोकण प्रदेशाची निर्मिती श्री विष्णुचा सहावा अवतार असलेल्या श्री परशूरामाने केली. परशूरामाने एकवीस वेळा पृथ्वी नि:क्षत्र केल्यावर, त्याने जिंकलेली सर्व भूमी ऋषी कश्यपांना दान केली. स्वत: परशूराम दक्षिण पर्वतांवर निघुन गेले व तेथे त्यांनी शूर्पारक देशाची निर्मीती सागरा पासुन केली असा उल्लेख महाभारताच्या शांतिपर्वात आढळतो.

पौराणिक कथेनुसार परशूरामाने स्वत:च्या वास्तव्यासाठी नवीन भूमी तयार करण्याचा निश्चय केला आणि त्या प्रमाणे सिंधु सागराला (अरबी सुमद्राला) मागे हटण्याचा आदेश दिला. सागराने परशूरामाच्या बाणाच्या टप्प्या पर्यंत मागे हटण्याचे मान्य केले. त्याप्रमाणे परशूरामाने सह्याद्री वरून शरसंधान केले व कोकणची भूमी निर्माण केली. त्या नंतर परशूराम सध्या उत्तर कर्नाटकात असलेल्या गोकर्ण क्षेत्री वास्तव्य करू लागले.

कोकणस्थ ब्राम्हणांची निर्मीती देखिल परशूरामाने केली [अशी पौराणिक कथा प्रसिद्ध आहे. यातील काही ब्राम्हणास चितेतून पुन्हा जीवदान देवून पुढील आयुष्य जगण्याचे वरदान मिळाले म्हणून त्यांना चित्पावन असे संबोधतात. गौड सारस्वत व केरळ मधील नंबूथिरी ब्राम्हणांच्या उगमा संदर्भात देखिल याच प्रकारच्या परशूराम कथेवर आधारित आख्यायिका आहेत. कोकणात अनेक ठिकाणी या आख्यायिकेला अनुरूप असे पुरावे सापडतात. रत्‍नागिरी जिल्ह्यात चिपळूण जवळ लोटे परशूराम हे प्रसिद्ध परशूराम क्षेत्र व प्राचीन मंदिर आहे. गोव्यात पैगिनिम (इंग्रजी:Painguinim) या गावी एक प्राचीन परशूराम मंदिर आहे.

कोकण विभागाची संरचना

राजकीय

महाराष्ट्राच्या सहा प्रशासकीय विभागांपैकी कोकण विभाग हा एक आहे. या विभागात सहा जिल्हे व ७२० कि.मी लांबीच्या किनारपट्टीचा समावेष होतो.

क्षेत्रफळ: ३०७४६ चौ. कि. मी

लोकसंख्या: २,४८,०७,३५७ (सन २००१ जनगणने नुसार)

कोकणातील जिल्हे:

मुंबई जिल्हा

मुंबई उपनगर जिल्हा

पालघर जिल्हा

ठाणे जिल्हा

रायगड जिल्हा

रत्‍नागिरी जिल्हा

सिंधुदुर्ग जिल्हा

प्रमुख भाषा: मराठी, कोकणी, मालवणी

साक्षरता: ८१.३६ %

प्रमुख आकर्षणे

मंदीरे व देवस्थाने

गणपतीपुळे

लोटे परशुराम

वेळणेश्वर

मार्लेश्वर संगमेश्वर

कर्णेश्वर संगमेश्वर

गणपती मंदिर आंजर्ला

याला कड्यावरचा गणपती म्हणतात.

# पाली (रायगड) अष्टविनायक

मह्ड (रायगड) अष्टविनायक

हेदवीचा दशभुजा गणेश

रेडीचा गणपती

दीवेआगरचा सुवर्णगणेश्.

जलदुर्ग

विजयदुर्ग किल्ला

मुरूडचा जंजीरा

पर्यटन स्थळे

अलिबाग

वेंगुर्ला

गुहागर

श्रीवर्धन

हरिहरेश्वर

रत्‍नागिरी

महाराष्ट्राचे भूषण रायगड किल्ला.

मालवण

मुरूड- हर्णे

थंड हवेची ठिकाणे

माथेरान

आंबोली (सिंधुदुर्ग जिल्हा)

मुंबई ही भारतातल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर वसले आहे. मुंबई हे भारतातील सर्वांत श्रीमंत शहर असून दक्षिण, पश्चिम आणि मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. मुंबई शहराला नैसर्गिक बंदर लाभले असून या बंदरातून सागरी मार्गाने होणारी भारताची ५०% मालवाहतूक होते.

मुंबई १८व्या शतकाच्या मध्यकाळात ब्रिटिशांद्वारे सात बेटांना जोडून बनविण्यात आली. १९व्या शतकात आर्थिक व शैक्षणिक प्रगती झाली आणि २०व्या शतकामध्ये स्वतंत्रता चळवळीचा पाया मुंबईतच मजबूत झाला. इ.स. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळताना मुंबई शहर हे ब्रिटिशांनी बनविलेल्या मुंबई इलाख्यातच राहिले. इ.स. १९६० साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली व मुंबई या नवीन राज्याचीही राजधानी बनली. १९९५ मध्ये शिवसेनेची सत्ता असताना या शहराचे नाव अधिकृतपणे बॉम्बे पासून मुंबई करण्यात आलं.

मुंबई ही भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे. रिझर्व बँक, मुंबई शेअर बाजार, राष्ट्रीय शेअर बाजार या महत्त्वाच्या आर्थिक संस्था या शहरात आहेत. मुंबईत अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत. येथे व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने देशाच्या इतर भागातून मोठ्या प्रमाणात लोक मुंबईत येतात.

मुंबई हे बॉलीवूड व मराठी उद्योगाचे केंद्र आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईच्या हद्दीतच आहे.

Check Also

महडचा वरदविनायक

महडचा वरदविनायक

Varadvinayak Mahad महडचा वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी सातवा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ …

Leave a Reply