गडचिरोली जिल्हा

गडचिरोली जिल्हा

गडचिरोली जिल्हा

२६ ऑगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला. गडचिरोली, सिरोंचा हे चंद्रपूर जिल्ह्यामधील तालुके होते.  महाराष्ट्र राज्यात ईशान्य दिशेला असून आंध्र प्रदेशछत्तीसगड राज्यांच्या सीमेलगत आहे. हा जिल्हा नक्षलग्रस्त आहे. जिल्हा जवळपास ७६ % जंगलाने व्यापलेला असल्याने घनदाट जंगलात नक्सल समर्थक लोक आश्रय घेतात. जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४,४१४ चौ.कि.मी आहे.
फार प्राचीन काळी ह्या प्रदेशावर राष्ट्कूट यांचे राज्य होते. त्यानंतर चालुक्य वंशाचे व नंतर देवगिरीच्या यादवांचे राज्य आले. यानंतर गडचिरोलीवर गोंड राजांनी राज्य केले. तेराव्या शतकात, खंडक्या बल्लाळ शाह यांनी चंद्रपूरची स्थापना केली. त्यांनी आपली राजधानी सिरपूर येथून चंद्रपूर येथे हलविली. याच काळात चंद्रपूर प्रदेश हा मराठ्याच्या सत्तेखाली आला. १८५३ मध्ये, बेरार हा चंद्रपूर (पूर्वीचे चांदा) प्रदेशाचा भाग ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात आला. १८५४ मध्ये चंद्रपूर हा बेरार या प्रदेशामधला स्वतंत्र जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. ब्रिटिशांनी १९०५ मध्ये चंद्रपूरमधील व ब्रह्मपुरीमधील जमीनदारी व मालमत्ता हस्तांतरण करून गडचिरोली तालुक्याची निर्मिती केली. राज्याची पुनर्रचना होण्यापूर्वी हा भाग १९५६ पर्यंत केंद्रीय अधिपत्याखाली होता. त्यानंतर राज्यपुनर्रचनेनुसार चंद्रपूर बॉम्बे स्टेटमध्ये समाविष्ट करण्यात आले. १९६०मध्ये महाराष्ट्र राज्य निर्माण झाले, त्यांत चंद्रपूर हा जिल्हा समाविष्ट झाला. १९८२ मध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून स्वतंत्र  जिल्हा अस्तित्वात आला.

गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यातील मार्कंडाचे ऐतिहासिक शिवमंदिर व चप्राळा येथील हनुमान मंदिर ही प्रसिद्ध मंदिरे आहेत. कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा येथून १० किलोमीटर अंतरावर खोब्रामेंढा देवस्थान असून तेथे खूप मोठी मारुतीची मूर्ती आहे.

Check Also

कोल्हापूर जिल्हा

कोल्हापूर जिल्हा

कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. कोल्हापूर ऐतिहासिक महालक्ष्मी मंदिर, कोल्हापुरी चपला, …

नाशिक जिल्हा

नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा 18.33 आणि 20.53 डिग्री उत्तर अक्षांश आणि 73.16 डिग्री आणि 75.16 …

नंदुरबार जिल्हा

नंदुरबार जिल्हा

नंदुरबार जिल्हा नंदुरबार भारतातील महाराष्ट्र राज्याच्या खान्देश विभागातील एक जिल्हा आहे आणि तालुकाचे मुख्यालय ठिकाण …

जळगाव जिल्हा

जळगाव जिल्हा

जळगाव जिल्हा विशेष – केळ्यांचे आगर ही जळगाव जिल्ह्याची सर्वांत महत्त्वाची ओळख होय. उत्तर महाराष्ट्रातील …

Leave a Reply