गुणवंतगड

पाटण वरून चिपळूणकडे जाताना एक फाटा फुटतो, पश्चिम-नैऋत्य दिशेला १० किलोमीटर अंतरावर मोरगीरीचा प्रसिद्ध गुणवंतगड किल्ला आहे. पाटण जवळील हा गड मोरगिरीचा किल्ला म्हणून देखील ओळखला जातो. पश्चिम-वायव्य दिशेला दातेगड आहे, या दोन्ही गडांमधून कोयना नदी आणि हेळवाक पाटण रस्ता जातो.

इतिहास:१८ व्या शतकात पेशव्यांच्या राजवटीत या गडाचा उपयोग सैन्यतळ म्हणून केला गेला होता. त्याआधी टेहळणीसाठी या गडाचा उपयोग केला जात असावा. इ.स.१८१८ च्या मराठा युद्धात हा किल्ला ब्रिटिशांकडे सोपण्यात आला.सध्या गुणवंतगडावर इतिहासाच्या कोणत्याही खाणाखुणा नाहीत. फक्त एक विहीर शिल्लक आहे.पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात देखील मोरगिरी नावाचा किल्ला आहे.

admin

Leave a Reply

Next Post

दातेगड/सुंदरगड

Fri May 3 , 2019
महाराष्ट्रात अनेक प्रसिद्ध ऐतिहासिक गडकिल्ले आहेत. या गडांशी सातवाहनांपासून छत्रपती शिवाजीमहाराजांपर्यंत अनेकांचं नातं आहे. ज्या गडकिल्ल्यांचा इतिहास इतिहासकारांनी मांडला ते किल्ले महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. मात्र इतिहासामध्ये महत्त्वाची कामगिरी करूनही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले अनेक किल्ले प्रसिद्धीपासून वंचित राहिले. चारही बाजूंनी नैसर्गिक काळ्या कातळाची तटबंदी लाभलेल्या दातेगडाचे दुर्गवैशिष्ट्ये म्हणजे या गडावरील बऱ्याच वास्तू […]
WhatsApp chat
%d bloggers like this: