गुणवान विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य.

अ.क्र. योजना सविस्तर माहिती
योजनेचे नाव : गुणवान विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य.
योजने बद्दलचा शासन निर्णय : शासन निर्णय शिक्षण व सेवायोजन विभाग, एएफईडी 1083/181635(2317) साशि-5 दि. 17.05.1984 नूसार गुणवान विद्यार्थ्यांकरिता आर्थिक सहाय्य देण्याची योजना सन 1984-85 च्या शैक्षणिक वर्षापासून कार्यान्वित करण्यात आली आहे..
योजनेचा प्रकार : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडाळाच्या पुणे,मुंबई,लातूर,औरंगाबाद,नाशिक,कोल्हापूर,अमरावती व नागपूर परीक्षा याविभागाती परीक्षेत वरचा क्रमांक मिळविणाऱ्या गुणवान विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्तेस आर्थिक अडचनीमुळे बाधा पोहचू नये या उददेशाने आशा विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणसाठी आर्थिक साहय्य देण्यात येते.
योजनेचा उद्देश : माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा यामध्ये वरचा क्रमांक मिळविणाऱ्या गुणवान विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण पुर्ण करण्यासाठी.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्व संवर्गातील गुणवान विद्यार्थ्यांनासाठी.
योजनेच्या प्रमुख अटी :
 • 1) दरवर्षी माध्यमिक व उच्च माध्यमिक शालान्त परीक्षांमध्ये वरचा क्रमांक मिळवणे आवश्यक.
 • 2. नूतनीकरणासाठी विद्याथ्यांने कनिष्ठ स्तरावर किमान 55 टक्के व वरिष्ठ स्तरावर किमान 65 टक्के गुण घेऊन पुढील वर्गात प्रवेश घेतला पाहिजे
 • 3.विद्यार्थ्यांने जो अभ्यासक्रम घेतला असेल, तो त्याने किमाण त्या अभ्यासक्रमाच्या पदवी/पदवीका पर्यंत पुर्ण केला पाहिजे.
 • 4.एखादा निवडलेला अभ्यासक्रम बदल करावयाचा असल्यास त्यासाठी विद्यार्थ्यांने शिक्षण संचालकाची पुर्व-संमती घेणे आवश्यक आहे.
 • 5.विविध शुल्काची (फीची) प्रतिपुर्ती शासनाने किंवा संबंधीत विद्यापीठाने मान्य केलेल्या दरानुसार केली जाईल.
 • 6.या योजनेचा लाभ घेत असतांना विद्यार्थ्यांला केंद्र अथवा राज्य शासनाच्या इतर कोणत्याही शिष्यवृत्तीचा अथवा सवलतीचा लाभ घेता येणार नाही.
आवश्यक कागदपत्रे :
 • 1. माध्यमिक व उच्च माध्यमिक शालान्त परीक्षांमध्ये विद्याथ्यांने कनिष्ठ स्तरावर किमान 55 टक्के व वरिष्ठ स्तरावर किमान 65 टक्के असलेबाबतचे गुणपत्रीका.
 • 2. बँक खाते पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत.
 • 3. मागील वर्षाची गुण पत्रीका.
 • 4. विद्यार्थ्यांने महाविद्यालयात फी भारलेल्याची पावती.
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : 11 वी 12 प्रतिवर्ष -1600 ते 1800/- पदवीसाठी (कला, वाणिज्य, विज्ञान)- प्रतिवर्ष 3100/- इंजीनेअरीगं – प्रतिवर्ष 14500/- मेडीकल प्रतिवर्ष- 15400/- सदर रक्कम ही भारतीय स्टेट बँक ॲाफ ईडिया पुणे कोषागार शाखा,पुणे यांचामार्फत विद्यार्थ्यांचे बँक खातेवर थेट (NFT) जमा करण्यात येते.
अर्ज करण्याची पद्धत : सदर योजनेसाठी इयत्ता 10 वी व 12 वी च्या निकालानंतर विभागीय शिक्षण मंडळ पुणे, यांच्या कडून प्राप्त झालेल्या यादी नुसार पात्र विद्यार्थ्यांना सदर शिष्यवृत्ती सवलतीचे अर्ज पाठविण्यात येतात.सदर अर्ज विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयामार्फत प्राप्त झाल्या नंतर शिष्यवृत्ती मंजुरीचे आदेश काडण्यात येतात.नुतनीकरणासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्याल्यामार्फत अर्ज करणे आवश्यक आहे.
१० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयामार्फत संचालनालयास माहे सप्टेंबर पर्यंत येने आवश्क आहे. सदर अर्जाची छाननी होऊन शिष्यवृत्तीची रक्कम माहे एप्रिल मध्ये विद्यार्थ्यांना थेट त्यांचे खातेवर वितरीत होते. (कालावधी : जुलै ते एप्रिल – 9 ते 10 महिने)
११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : उच्च शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत, ससून सर्वोपचार रुग्णालयाजवळ, पुणे स्टेशन, पुणे -411 001.
१२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: सदर योजना ऑफलाईन पध्दतीने राबविण्यात

Check Also

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव …

6 comments

 1. Pingback: smart device

 2. Pingback: ms88ca

 3. Pingback: slotxo

 4. Pingback: Apollon Market

 5. Pingback: unicc shop

 6. Pingback: ca cuoc bong da ao truc tuyen

Leave a Reply