गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

योजनेचे नाव : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
योजना सुरु करण्यात आलेले वर्ष सन 2005-06
योजनेचा प्रकार :
 • अपघात विमा योजना
 • योजनेमध्ये केंद्र व राज्याचा हिस्सा :- 100 टक्के राज्य हिस्सा
योजनेचा उद्देश
 • राज्यात शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे इ. नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास अथवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास निर्माण होणाऱ्या अडचणीच्या परिस्थितीत शेतकऱ्याच्या कुटुंबाला लाभ देण्याकरिता रु. 2 लाखाचा विमा उतरविला जातो.
 • योजनेसाठी चालु वर्षाची तरतुद :- 35 कोटी
 • लाभार्थ्यांना अनुदान देण्याची पध्दत (mode of payment) :- विमा कंपनीकडून विमा दावा मंजूर झालेनंतर रक्कम आर.टी.जी.एस. द्वारे वारसदाराच्या बँक खात्यावर जमा होते.
 • अनुदानाची मर्यादा :- रु. 2 लाखांपर्यंत विमा संरक्षण
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : राज्यातील सर्व 7/12 धारक शेतकरी
योजनेच्या प्रमुख अटी : महाराष्ट्र राज्यातील 10 ते 75 वयोगटातील 7/12 धारक शेतकरी असणे आवश्यक.
आवश्यक कागदपत्रे
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
 • (1) अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपघातामुळे 2 डोळे अथवा 2 अवयव निकामी झाल्यास किंवा अपघातामुळे 1 डोळा व 1 अवयव निकामी झाल्यास रु. 2 लाख विमा संरक्षण.
 • (2) अपघातामुळे 1 डोळा अथवा 1 अवयव निकामी झाल्यास रु. 1 लाखाचे विमा संरक्षण.
 • अद्याप पर्यंत झालेला खर्च
 • (1) सन 2015-16 या आर्थिक वर्षात रु. 27.95 कोटी.
 • (2) सन 2016-17 मध्ये या आर्थिक वर्षात निरंक.
 • लाभार्थ्यांची संख्या / गट / समुह :——शासनामार्फत राज्यातील 1.37 कोटी शेतकऱ्यांचा विमा हप्ता भरण्यात येतो. शेतकऱ्याने कोणतीही विमा रक्कम भरण्याची आवश्यकता नाही.
 • योजनेचे घटक व त्याची थोडक्यात माहिती :-
 • योजना राबविताना येणाऱ्या अडचणी:-
 • नाही.
 • योजनेची भविष्यातील नियोजन:-
 • दरवर्षी शासनामार्फत 1.37 कोटी शेतकऱ्यांचा विमा हप्ता भरण्यात येतो.
 • लाभार्थी निवडीसाठी असलेल्या समित्या व त्यांची कार्यकक्षा
 • सर्व शेतकऱ्यांचा विमा हप्ता भरण्यात येतो.
अर्ज करण्याची पध्दत
१० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर 60 दिवसात.
११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :
 • संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालय व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय.
 • मुख्य सांख्यिक, कृषि आयुक्तालय, पुणे. फो.नं. 020/26121041
 • शासनस्तवरील संपर्क – अवर सचिव (11-अे), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई-32.
१२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:

Check Also

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव …

Leave a Reply