Amazon Big Sell

गोवा किल्ला

हर्णेच्या किनार्‍यावर सुवर्णगडाचे रक्षण करण्यासाठी जी दुर्गत्रयी बांधली आहे त्यापैकी एक गोवा किल्ला, इतर दोन किल्ले कनकदूर्ग व फत्तेगड यांच्यापेक्षा हा किल्ला विस्ताराने बराच मोठा आहे. तसेच सदयस्थितीत बर्‍यापैकी चांगल्या अवस्थेत उभा आहे.

किल्ल्याला जमिनीच्या दिशेने एक व समुद्राच्या दिशेने एक असे दोन दरवाजे आहेत. किल्ल्याचा मुख्य दरवाजा समुद्राकडील बाजूस असून तो दगडांनी बंद केलेला आहे.

दरवाज्याच्या चौथर्‍याच्या तळाशी वाघाची आकृती आहे. डाव्या हातास दरवाजावर गंडभेरुड(म्हणजे द्विमुखी गरुड) व त्याने पायात पकडलेले चार हत्ती असे शिल्प आहे. दरवाज्याच्या डाव्या बाजूस असलेल्या दुर्मिळ शिल्पात ३ कुत्र्यांनी एकमेकांचे गळे आपापल्या जबड्यात पकडले आहेत व पायात प्रत्येकी दोन हत्ती पकडले आहेत.

हत्तींनी आपापल्या सोंडांनी दुसर्‍या हत्तींच्या शेपट्या पकडल्या आहेत. किल्ल्याच्या दरवाजा समोरील तटावर मारुतीची मुर्ती आहे. किल्ल्यात एक साचपाण्याचे टाक आहे. किल्ल्याच्या दक्षिणभागात नैसर्गिक उंचवटा आहे, त्यावर किल्ल्याचा बालेकिल्ला आहे. तटाला असलेल्या पायर्‍यांनी तटावर चढून तटफेरी मारता येते. गडावर कलेक्टरच्या विश्रामधामाचे अवशेष आहेत. १८६२ मध्ये किल्ल्यावर ६९ तोफा व १९ शिपाइ असल्याचा उल्लेख आढळतो.

Asha Transcription

Check Also

रोहिडा किल्ला

Rohida Fort Rohida Fort : सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक सुरेख डोंगरमार्ग आहे. …

Leave a Reply