चांदपूर किल्ला

भंडारा जिल्ह्याचे अस्तित्व ११व्या शतकातदेखील होते याची नोंद रतनपूर (जि. बिलासपूर) येथील उत्खननात सापडलेल्या शिलालेखावरती आहे. महानुभव पंथाच्या लीलाचरित्र या पवित्र अशा ग्रंथात भंडारा जिल्ह्याचा संदर्भ अनेकदा आलेला आढळतो. उत्तम निसर्गसंपदा लाभलेला हा जिल्हा १७४३ पर्यंत गवळी राजवटीखाली होता.

गवळी राजवटीत बांधलेला किल्ला भंडारा शहरातच आहे. त्याकाळी बांधलेला खांब तलाव आजही टिकून आहे. भंडारा जिल्हा अधिकृतरीत्या १८२१ मध्ये अस्तित्वात आल्याची नोंद इतिहासात आढळते. त्यानंतर १८५३ पर्यंत येथे मराठेशाही होती.

मराठेशाहीच्या वारसदारा-अभावी भंडारा जिल्हा १८५३ मध्ये इंग्रजांच्या हाती गेला. पूर्व महाराष्ट्रातील (विदर्भातील) या जिल्ह्याचे १९९९ मध्ये विभाजन करण्यात आले व नवा गोंदिया जिल्हा निर्माण करण्यात आला.

admin

Leave a Reply

Next Post

सहानगड

Fri May 3 , 2019
भंडारा जिल्ह्यातील साकोली हे तालुक्याचे ठिकाण असून ते पुरातन मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. किल्ल्याला सहानगड हे उपनाव आहे, स्थानिक बोली भाषेत सां म्हणजे लहान आणि गडी म्हणजे किल्ला या शब्दफोडीने सांगडी हे किल्ल्याचे नाव पडले. वैनगंगेच्या काठावर असलेले हे ठिकाण बौध्द धर्मीयांचे महत्त्वाचे क्षेत्र आहे. तिथे बौध्दकाळातील स्तूप आहे. कर्हाडा आणि […]
WhatsApp chat
%d bloggers like this: