Amazon Big Sell

चित्रकला स्पर्धत तुमचा पहिला क्रमांक आल्याचे बाबांना पत्र पाठवून कळवा

२५ / ७, नचिकेत निवास,
यादव पेठ ,
सातारा ( शहर ) , सातारा.
दि. १४/७/२०१८.

प्रिय बाबांना,
सप्रेम साष्टांग नमस्कार.

एक आनंदाची बातमी आहे. ‘१५ ऑगस्ट – स्वातंत्र्यदिन’ या निमित्ताने आमच्या शाळेत अनेक स्पर्धा झाल्या. त्यांतील चित्रकला स्पर्धत मी भाग घेतला होता, त्या स्पर्धत माझे चित्र सर्वोत्कृष्ट ठरले. मला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले!

कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मला बक्षीस मिळाले. सर्वांनी खूप कौतुक केले. बक्षीस म्हणून मला एक चित्रकलेच्या अभ्यासाचे पुस्तक मिळाले आहे. माझे यश पाहून आईलाही खूप आनंद झाला.

आता यापुढे मी चित्रकलेचा खूप अभ्यास करणार व अशीच प्रगती करणार.

तुमचाच,
आशिष

Asha Transcription

About admin

Check Also

school letter writing marathi

शाळेच्या वार्षिक संमेलनात पारितोषिक मिळवल्या बद्दल वडिलांना वर्णन पत्र.

School Letter Writing Marathi दिनांक :-२० सप्टेंबर २०१८ कांदिवली पूर्व, मुंबई तीर्थरूप बाबांस, चि . …