Amazon Big Sell

छात्रपूर्व प्रशिक्षण योजना

अ.क्र. योजना सविस्तर माहिती
योजनेचे नाव : छात्रपूर्व प्रशिक्षण योजना (22350033)
योजने बद्दलचा शासन निर्णय : Govt of Maharashtra Resolution No S.B.II/MMM.5363/7971 dt 19/03/1963.
योजनेचा प्रकार : शासकिय योजना
योजनेचा उद्देश : महाराष्ट्रातील होतकरु तरुणांना संरक्षण दलात अधिकारी पदावर भरती करण्यासाठी योग्य ते प्रशिक्षण देणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक येथे सुरु करण्यात आले आहे. या केंद्रात कंबाईन्ड डिफेंस सर्व्हिसेस कोर्स (CDS), सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (SSB) हे कोर्स चालविण्यात येतात.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : महाराष्ट्रातील सर्व तरुणाना लागू आहे.
योजनेच्या प्रमुख अटी : अ) संघ लोकसेवा आयोग (UPSC) यांचे मार्फत घेण्यात येणा-या कंबाईन्ड डिफेंस सर्व्हिसेस कोर्स (CDS) या संरक्षण दलातील अधिकारी पदाच्या परीक्षेकरिता फॉर्म भरलेले महाराष्ट्रीय युवक व युवती. ब) कंबाईन्ड डिफेंस सर्व्हिसेस परिक्षा अथवा नॅशनल डिफेंस अकॅडमी परीक्षा पास झालेली व सर्विसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र असलेले युवक/युवती.
आवश्यक कागदपत्रे : उपरोक्त परिक्षा पास झालेला लेखी पुरावा.
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : संघ लोकसेवा आयेाग यांचे मार्फत घेण्यात येणा-या CDS परिक्षेपूर्वी 75 दिवस कालावधीचा कोर्स आयोजित करण्यात येतो. तसेच कंबाईन्ड डिफेंस सर्व्हिसेस या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी 10 दिवस कालावधी चा SSB कोर्सचे आयोजन करण्यात येते.
अर्ज करण्याची पद्धत :

  महाराष्ट्रातील उपरोक्त पात्रता पूर्ण युवक/युवती यांनी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक यांचेकडे संबधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

  १० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : 75 दिवस कालावधी चा CDS कोर्स व 10दिवस कालावधीचा SSB कोर्स (वर्षभरात एसएसबी चे 04 कोर्स व सीडीएसचे 02 कोर्स)
  ११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक
  १२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: On line अर्ज करण्याचे संकेत स्थ्ळ अदयाप सुरु करण्यात आलेले नाही
  Asha Transcription

  About admin

  Check Also

  इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण

  इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव …