जळगाव जिल्हा

जळगाव जिल्हा

विशेष
केळ्यांचे आगर ही जळगाव जिल्ह्याची सर्वांत महत्त्वाची ओळख होय. उत्तर महाराष्ट्रातील (ज्याला खानदेश असे म्हटले जाते) हा एक वैशिष्ट्यपूर्ण जिल्हा होय. सातपुड्याच्या रांगेतील आदिवासींचे वास्तव्य; भारतातील प्रमुख नदी असणा-या् तापीचा जिल्ह्यातून जाणारा प्रवाह, मूलभूत सोयीसुविधा सशक्त करणारे रेल्वेचे जाळे आणि आधुनिक शेतीचे -सिंचनाचे यशस्वी प्रयोग… या जिल्ह्याची अशी अनेक वैशिष्ट्ये सांगाता येतील.
खानदेश म्हणून ओळखला जाणा-या् ह्या जिल्ह्याने सातवाहनांपासून, मराठे व त्यांनतर इंग्रजांपर्यंत अनेक राजवटी पाहिल्या. १९०६ मध्ये जेव्हा खानदेशाची विभागणी झाली तेव्हा हा पूर्व खानदेश सध्याचे जळगाव बनला. तदनंतर १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती बरोबर जळगाव राज्यात दाखल झाला.

भूगोल

जळगाव जिल्हा महाराष्ट्राच्या उत्तरेकडील जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या उत्तरेला मध्य प्रदेश राज्य, पूर्वेला बुलढाणा, दक्षिणेला औरंगाबाद जिल्हा, नैऋत्येला नाशिक, पश्र्चिमेला धुळे जिल्हा –

असे जिल्हे वसलेले आहेत. जळगाव जिल्ह्यातील शेतीची प्रगती ही तेथे उपलब्ध असणार्या जलसंपदेमुळेच होय. तापी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी असून ती मध्य प्रदेश राज्यात उगम पावते. ह्या नदीचे वैशिष्ट्य म्हणजे, ही नदी इतर नद्यांसारखी पश्चिम घाटातून बंगालच्या उपसागराला न मिळता, पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्रास मिळते. (ही नदी पश्र्चिमवाहिनी आहे.)
शेती विकासासाठी व पिण्याच्या पाण्याच्या वापरासाठी, जळगाव जिल्ह्याने, अनोखा असा नदीजोड प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली असून, पायलट (पथदर्शी) प्रकल्प म्हणून यशस्वीदेखील करून दाखविला आहे. जिल्ह्यातील हवामान विषम व कोरडे आहे. त्या-त्या काळात कहक थंडी व अतिउष्ण उन्हाळा असे हवामान या भागात असते. जिल्ह्याच्या उत्तर सीमेवर (मध्य प्रदेशास लागून) सांतपुडा पर्वतरांगा असून या भागात जंगलांचे प्रमाण जास्त आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था
क्र. प्रशासनाचा प्रकार संख्या नावे
१ महानगरपालिका १ जळगाव.
२ नगरपालिका १३ भुसावळ, अमळनेर, चाळीसगांव, चोपडा, पाचोरार्, फैजपूर, यावल, रावेर, सावडा,
पारोळे, धरणगाव, एरंडोल,जामनेर.
३ जिल्हा परिषद १ जळगाव.
४ पंचायत समित्या १५ चाळीसगांव, भडगाव, पारोळे, अमळनेर, चोपडा,एरंडोल, जळगाव, पाचोरा, जामनेर,
भुसावळ,यावल, रावेर,एदलाबाद/ मुक्ताईनगर, बोदवड, धरणगाव.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ६८ मतदारसंघ असून पंचायत समितीचे १३६ मतदारसंघ आहेत.

वैशिष्ट्य

पूज्य सानेगुरुजी, बालकवी ठोमरे, माधव जूलिअन्, बहिणाबाई चौधरी, स्वामी कुवलयानंद हे या जिल्ह्याचे आधुनिक काळास देणे, तर सखाराम महाराज समाधीने व तत्त्वज्ञान मंदिराने महाराष्ट्राची पंढरी बनलेले अमळनेर, पर्शियन शिलालेख व पांडववाडा असलेले एकचक्रानगर म्हणजे हल्लीचे एरंडोल, यादवकालीन शिल्प असलेले पाटण, चांगदेव व पारोळे इ. गावे हे या जिल्ह्याचे सांस्कृतिक लेणे आहे. उनपदेव, सुनपदेव, नाझरदेव येथे उष्ण झरे व पाल-मनुदेवी ही निसर्गरमणीय स्थाने प्रवासी आकर्षणे आहेत. फैजपूर हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे पहिले ग्रामीण अधिवेशनस्थळ म्हणून अजरामर, तर वरखेडी बुद्रुक हे केवळ सामान्य जनांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध दिलेल्या असामान्य लढ्यासाठी स्मरणीय आहे.

Check Also

सांगली जिल्हा

सांगली जिल्हा प्राचीन इतिहास असलेल्या सांगली जिल्ह्याने मौर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, यादव, बहामनी व मराठी …

Leave a Reply