Amazon Big Sell

जवाहरलाल नेहरु विद्यापीठ शिष्यवृत्ती

अ.क्र. योजना सविस्तर माहिती
योजनेचे नाव : जवाहरलाल नेहरु विद्यापीठ शिष्यवृत्ती
योजने बद्दलचा शासन निर्णय : एससीएच/1082/151160/2173/जनरल-5, दि. 07/05/1983 अन्वये महाराष्ट्र राज्यासाठी एक संच निर्धारित केला आहे.
योजनेचा प्रकार : जवाहरलाल नेहरु विद्यापीठाने नवी दिल्ली त्यांचेकडून विहित नियमानुसार निवड करुन त्या विद्यापीठात शिकत असलेल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांमधून एका विद्यार्थ्याची निवड केली जाते. जवाहरलाल नेहरु विद्यापीठाने निवड केल्यानुसार विद्यार्थ्यांचा स्वयंपुर्ण प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे सादर करू न त्यास शासनाची मंजूरी मिळाल्यानंतर नवीन मंजूरीनंतर तीन वर्ष जवाहरलाल नेहरु विद्यापीठाने (नवी दिल्ली) पाठविलेल्या प्रगती अहवालानुसार नुतनीकरण मंजूर केले जाते.
योजनेचा उद्देश : जवाहरलाल नेहरु विद्यापीठात शिकत असलेल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना शिक्षण पुर्ण करता यावे.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्व संवर्गातील गुणवान विद्यार्थ्यांसाठी.
योजनेच्या प्रमुख अटी : 1.विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे : 1.जवाहरलाल नेहरु विद्यापीठाने त्यांचेकडून विहित नियमानुसार.
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : द. मा. रु.8000/- व रु.10000 सादीलवार खर्च.
अर्ज करण्याची पद्धत : जवाहरलाल नेहरु विद्यापीठाने त्यांचेकडील विहित नियमानुसार निवड झाल्यानंतर विद्यापीठ स्तरांवरुन संचालनालयास कळविण्यात येते.
१० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया साधारणपणे माहे ऑगस्ट ते मार्च पर्यंत असतेे. सदर अर्जाची विविध स्तरांवरील छाननी होऊन शिष्यवृत्तीची रक्कम माहे एप्रिल मध्ये विद्यार्थ्यांना थेट त्यांचे खातेवर वितरीत होते. (कालावधी : ऑगस्ट ते मार्च – 8 ते 10 महिने)
११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : उच्च शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत, ससून सर्वोपचार रुग्णालयाजवळ, पुणे स्टेशन, पुणे -411 001.
१२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:
Asha Transcription

Check Also

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव …

Leave a Reply