जिल्हा वार्षिक योजना- (अनुसूचित जातीच्या लाभार्थींना ०२ दुधाळ जनावरांचे गट वाटप योजना

अ. क्र.Schemeसविस्तर माहिती
योजनेचे नाव :जिल्हा वार्षिक योजना- (अनुसूचित जातीच्या लाभार्थींना ०२ दुधाळ जनावरांचे गट वाटप योजना
योजने बद्दलचा शासन निर्णय :शासन निर्णय क्र. जिवायो-२०११/प्र.क्र.३०५/पदुम-४, मंत्रालय, मुंबई-३२.
योजनेचा प्रकार :वैयक्तिक लाभाची योजना
योजनेचा उद्देश :राज्यातील ग्रामीण भागात दुग्धोत्पादनास चालना देण्यासाठी
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव :अनुसूचित जाती / आदिवासी / अदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी
योजनेच्या प्रमुख अटी :
 • १. लाभधारकाने २ दुधाळ जनावरांचा गटासाठी आवश्यक निवारा, पुरेसा चारा, खाद्य व पाणी याची व्यवस्था स्वबळावर करावयाची आहे.
 • २. योजनेअंतर्गत – प्राप्त झालेल्या गटातील गायी/म्हशी, पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांना पाठपुरावा/ योजना मूल्यांकनासाठी आवश्यक त्या वेळेस उपलब्ध करून देणे.
 • ३.योजनेअंतर्गत प्राप्त झालेले गायी/म्हशी आजारी पडल्यास अथवा पशुवैद्यकाची गरज पडल्यास नजिकच्या पशुवैद्यकिय दवाखान्यात घेऊन जाणे व त्यांच्या सल्यानूसार उपचार करून घेणे.
 • ४. योजनेअंतर्गत प्राप्त झालेले गायी/म्हशी ३ वर्षे योग्य रितीने सांभाळणे व त्यापासून व्यवसाय करणे बंधनकारक आहे. या दरम्यान विमा काढलेल्या जनावरांचा विम्याचा बिल्ला कानातून पडल्यास त्याबाबत त्वरीत बँक/ विमा कंपनी/पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांना कळविणे बंधनकारक आहे.
 • ५. योजनेअंतर्गत प्राप्त झालेले गाय/म्हैस मृत पावल्यास नजिकच्या पशुवैद्यकिय दवाखान्यास सूचित करून मृत जनांवराचे शवविच्छेदन करून घेईल व मिळणाऱ्या विमा रकमेतून गाय/म्हैस खरेदी करणे बंधनकारक राहील.
 • ६. योजनेअंतर्गत – प्राप्त झालेल्या गायी/म्हशींना साथीच्या रोगांपासून संरक्षण मिळण्यासाठी वेळोवेळी लसीकरण करून घेण्याची जबाबदारी लाभार्थींची राहील.
 • ७. योजनेअंतर्गत प्राप्त झालेले गायी/म्हशी, काही कारणाने (असाध्य आरोग्य तक्रार) नाईलाजास्तव विकणे गरजेचे असल्यास पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी यांचे परवानगी शिवाय विकता येणार नाही.
 • ८. लाभधारक पती/पत्नीपैकी कोणीही शासकीय/निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सेवेत किंवा सेवानिवृत्त नाही ,अथवा पदाधिकारी नसावेत.
 • ९.लाभधारकास दुधाळ जनावरांचा गट वाटप योजनेचा लाभ यापूर्वी मिळालेला नसावा.
 • १०. या योजनेमध्ये देण्यात आलेल्या दुधाळ जनावरांचा गट वनक्षेत्रात चराईसाठी सोडू नये आणि वन व पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घ्यावी.
आवश्यक कागदपत्रे :
 • १. फोटो ओळखपत्राची सत्यप्रत
 • २. ७/१२ व ८-अ उतारा आणि ग्रामपंचायत नमुना नं. ८
 • ३. प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित सत्यप्रत
 • ४ जातीच्या दाखल्याची सत्यप्रत
 • ५ बचत गट सदस्य असल्यास प्रमाणपत्र
 • ६. रोजगार-स्वयंरोजगार कार्यालयाचे नांव नोंदणी कार्डाची सत्यप्रत.
 • ७. अपत्य दाखला (ग्रामपंचायत यांचा)
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
 • दुधाळ जनांवरे प्रकल्पाची एकुण किंमत -रु. ८५०६१/-
 • अनुसूचित जाती /आदिवासी उपयोजना /आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेसाठी प्रकल्प किमतीच्या ७५ त्न अनुदान देय राहील.
अर्ज करण्याची पद्धत :नजिकचा पशुवैद्यकिय दवाखाना व पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समितीकडे अर्ज करावा लागेल.
१०अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :९० दिवस
११संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :
 • १.पशुधन विकास अधिकारी (विस्तार),पंचायत समिती
 • २.जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,,जिल्हा परिषद,
 • ३.जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त
१२Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ:सुविधा उपलब्ध नाहीत.

Check Also

इयत्ता 10 वी पर्यंतचे सर्वांना मोफत शिक्षण

सर्वांना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव : इयत्ता 10 वी पर्यंतचे …

संस्कृत शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना भारत सरकारच्या शिष्यवृत्या

संस्कृत शिक्षण  शाळांना भारत सरकारच्या शिष्यवृत्या अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव : संस्कृत …

प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना मोफत शिक्षण

प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव : प्राथमिक शिक्षकांच्या …

पदव्युत्तर स्तरापर्यंत मोफत शिक्षण

माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालयातील अध्यापकांच्या व अध्यापकेतर कर्मचाऱ्यांचे पाल्यांना पदव्युत्तर स्तरापर्यंत …

Leave a Reply