झाडे नसती तर | zade nasti tar essay in marathi

झाडे नसती तर : मित्रांनो मानव जातीच्या जीवनासाठी वृक्ष अर्थात झाडांचे महत्व फार आहे. झाडे ही व्यक्तीला प्राणवायू ऑक्सिजन सोबत इतर अनेक उपयोगी वस्तु उपलब्ध करवून देतात. परंतु आपण कधी विचार केला आहे की जर वृक्ष नसते तर? किंवा झाडे नसती तर.. जर झाडे नसती तर मनुष्य जीवनावर कोणते संकट उभे राहिले असते य विषयीची माहिती या लेखात देण्यात आली आहे.

zade nasti tar essay in marathi

झाडे, वृक्ष हे नाव एकताच, एकच गाणे आठवते व ते म्हणजे “वृक्षवल्ली आम्हा सोयरी”. परंतु आज हे फक्त गायनातच शिल्लक राहले आहे. निसर्ग आणि पर्यावरण हेच खरं जीवनाचा आधार आहे. झाडे नाही तर जीवन सुद्धा नाही. जग भरात विकासाच्या नावाखाली अनेक झाडे तोडली जात आहेत आणि यामुळे गंभीर परिणाम दिसायला लागले आहेत. आज

झाडे नष्ट झाल्यामुळे सर्व प्रदेश, पहाड, जंगल ओसाड पडले आहेत. औषधी युक्त वनस्पतीं मिळण ही दुर्मिळ झाली आहे. वृक्ष नष्ट होत असल्यामुळे पाऊस सुद्धा पडत नाही. या मुळे सृष्टीचे वैभव संकटात पडले आहे.

पाऊस कमी पडल्यामुळे सर्वात मोठी समस्या जाणवते आहे ती पाणी टंचाई ची. दूषित पाण्यामुळे रोगराई वाढत आहे. विकासाच्या नावाखाली वृक्षतोड़ झाल्यामुळे व नवीन वृक्षांची लागवड न झाल्यामुळे पर्जन्यमान कमी झाले आहे. शहरात उंच-उंच इमारतीचे बांधकाम, रस्ते दुरूस्ती, रस्तेरुंदी करण्या करता मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे, ज्यामुळे उष्णतेचा पारा वाढलेला आहे. देशात कित्येक ठिकाणी तापमान ४५° C पेक्षा अधिक पोहचला आहे. म्हणून विकासाच्या योजना आखताना व शहरीकरण करताना मूलभूत सुविधांकडे, पर्यावरण रक्षणाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

जंगल तोडी मुळे जंगलातील प्राणीही बेघर होत आहेत. आणि ते मानवी वस्त्यांमध्ये भक्ष व आसरा शोधत आहेत. आणि यामुळे जैविक आणि पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. हे सर्व थांबवण्याकरिता नागरीकांत वृक्ष तोडीचे भयानक परिणाम समजावून सांगणे आवश्यक झाले आहे. जंगलाची उपयुक्तता व वृक्षा रोपणाचे फायदे याची माहिती नागरिकात पोहचवलीत पाहिजे.

जर सर्व झाडे कापून टाकली, तर पाणीची कमी होईल, तापमान वाढणार, रोगराई पसरणार आणि संपूर्ण पर्यावरण नष्ट झाले तर भविष्यात पृथ्वीचे काय होईल. आणि वुक्षतोडीला जवाबदार ठरणारा मनुष्यच हे सर्व थांबवून सृष्टीला वाचवू शकतो.

***

तर मित्रहो या लेखाद्वारे आम्ही आपल्यासोबत झाडे नसती तर त्याचा मनुष्यावर आणि इतर जीव जंतूवर काय परिणाम झाला असता याविषयी चे चित्र एक निबंधाद्वारे चित्रित केले आहे. आशा करतो की आपणास ही माहिती उपयोगाची ठरली असेल. हा निबंध इतरांसोबतही नक्की शेअर करा. धन्यवाद.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *