झाडे नसती तर

झाडे, वृक्ष हे नाव एकताच, एकच गाणे आठवते व ते म्हणजे “वृक्षवल्ली आम्हा सोयरी”. परंतु आज हे फक्त गायनातच शिल्लक राहले आहे. निसर्ग आणि पर्यावरण हेच खरं जीवनाचा आधार आहे. झाडे नाही तर जीवन सुद्धा नाही. जग भरात विकासाच्या नावाखाली अनेक झाडे तोडली जात आहेत आणि यामुळे गंभीर परिणाम दिसायला लागले आहेत. आज

झाडे नष्ट झाल्यामुळे सर्व प्रदेश, पहाड, जंगल ओसाड पडले आहेत. औषधी युक्त वनस्पतीं मिळण ही दुर्मिळ झाली आहे. वृक्ष नष्ट होत असल्यामुळे पाऊस सुद्धा पडत नाही. या मुळे सृष्टीचे वैभव संकटात पडले आहे.

पाऊस कमी पडल्यामुळे सर्वात मोठी समस्या जाणवते आहे ती पाणी टंचाई ची. दूषित पाण्यामुळे रोगराई वाढत आहे. विकासाच्या नावाखाली वृक्षतोड़ झाल्यामुळे व नवीन वृक्षांची लागवड न झाल्यामुळे पर्जन्यमान कमी झाले आहे. शहरात उंच-उंच इमारतीचे बांधकाम, रस्ते दुरूस्ती, रस्तेरुंदी करण्या करता मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे, ज्यामुळे उष्णतेचा पारा वाढलेला आहे. देशात कित्येक ठिकाणी तापमान ४५° C पेक्षा अधिक पोहचला आहे. म्हणून विकासाच्या योजना आखताना व शहरीकरण करताना मूलभूत सुविधांकडे, पर्यावरण रक्षणाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

जंगल तोडी मुळे जंगलातील प्राणीही बेघर होत आहेत. आणि ते मानवी वस्त्यांमध्ये भक्ष व आसरा शोधत आहेत. आणि यामुळे जैविक आणि पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. हे सर्व थांबवण्याकरिता नागरीकांत वृक्ष तोडीचे भयानक परिणाम समजावून सांगणे आवश्यक झाले आहे. जंगलाची उपयुक्तता व वृक्षा रोपणाचे फायदे याची माहिती नागरिकात पोहचवलीत पाहिजे.

जर सर्व झाडे कापून टाकली, तर पाणीची कमी होईल, तापमान वाढणार, रोगराई पसरणार आणि संपूर्ण पर्यावरण नष्ट झाले तर भविष्यात पृथ्वीचे काय होईल. आणि वुक्षतोडीला जवाबदार ठरणारा मनुष्यच हे सर्व थांबवून सृष्टीला वाचवू शकतो.

admin

Leave a Reply

Next Post

मी नदी बोलतेय

Tue Apr 30 , 2019
उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही सर्व नातेवाईक उत्तर भारतात फिरण्यासाठी गेलो होतो. ताजमहाल, हृषीकेश आणि अशाच काही पर्यटन स्थळी आम्ही फिरून नंतर गंगोत्री या ठिकाणी सर्वजण गेलो. अशीच गंगेच्या काठावर मी भटकत होते. माझे मन स्थिर होत नव्हते. हृदयामध्ये कुठेतरी हुरहूर लागून राहिली होती. माझा स्वैरसंचार पाहून की काय पण एक हाक […]
WhatsApp chat
%d bloggers like this: