ताडासन

1) ताडासन करताना शरीराची स्थिती ताडीच्या झाडाप्रमाणे ताठ होते त्यामुळे या आसनाचे ताडासन असे नाव आहे.

2) ताडासन करण्याची पद्धत: – ताडासन हे सरळ उभे राहून केले जाते. पायाची बोटे व पंजे समांतर ठेवून हात सरळ कमरेला लावून उभे राहावे. त्यानंतर हळू हळू हात खांद्यापर्यंत आणून त्यांना डोक्याच्या वर नेताना केवळ तळ पायांवर उभे राहावे. मग हाताच्या पंज्यांना विरुद्ध दिशेने नेऊन मान सरळ ठेवून पुन्हा होते त्या दिशेत उभे राहावे.

3) सावधगिरी : हात डोक्याच्या दिशेने नेत असताना लक्षात ठेवायचे की, हाताची बोटे देखील सरळ रेषेत ठेवावीत. या अवस्थेत शरीराचे वजन हे पायाच्या बोटांवर असते. जेव्हा हातांना वरच्या बाजूला नेतात तेव्हा मात्र पोट हे आतल्या बाजूला घेतले पाहिजे.

4) ताडासनाचे फायदा : ताडासन नियमित केल्याने पायांचे स्नायू व पंजे मजबूत होतात. तसेच छाती व पोट यांच्यावर ताण पडल्याने त्याच्या संदर्भात असलेले आजार दूर होतात. वीर्यशक्तिमध्ये वाढ होऊन मुळव्यधी असलेल्या व्यक्तीला यापासून आराम पडतो. ताडासन लहान मुलांच्या शारीरिक वाढीसाठी महत्त्वपूर्ण आहे.

admin

Leave a Reply

Next Post

पूर्णधनुरासन

Sat May 11 , 2019
1) या आसनामध्ये शरीर पूर्णपणे ताणलेल्या धनुष्याबाणाप्रमाणे बनते. म्हणून त्याला पूर्ण धनुरासन असे म्हणतात. अर्ध धनुरासन व पूर्ण धनुरासनात विशेष असा फरक नाही. सामान्यत: यालाही धनुरासन असे म्हटले जाते. परंतु, सलग प्रयत्न केल्यावर जेव्हा हे आसन सिद्ध होते तेव्हा त्याला पूर्ण धनुरासनचा आकार प्राप्त होतो अर्थात ते पूर्णपणे ताणलेल्या धनुष्यबाणाप्रमाणे […]
WhatsApp chat
%d bloggers like this: