Amazon Big Sell

तुमच्या परीक्षेचा निकाल तुमच्या आईला कळण्यासाठी पत्र लिहा

रत्नधाम,
श्रीराम विद्यालय रस्ता,
गिरीगाव , मुंबई – ४००००५
दि. १०/८/२०१८.

तीर्थरूप आईस,

सप्रेम साष्टांग नमस्कार.

कालच आमच्या सहामाही परीक्षेचा निकाल जाहीर झाला. माझा वर्गात तिसरा क्रमांक आला ! आमच्या वर्गशिक्षिकांनी माझे खूप कौतुक केले.

त्यात मला गणित आणि मराठीत प्रत्येकी ९० आणि ८८ असे गुण मिळाले. इंग्रजीत मला ९५ गुण मिळाले. इतर विषयातही ८० च्या वर गुण मिळाले. आई , पुढच्या परीक्षेत मी अजून अभ्यास करीन आणि पहिला क्रमांक पटकवीण. सुट्टीत घरी आल्यावर मला मोठे बक्षीस पाहिजे हं !

बाबांना माझा नमस्कार सांग.

तुझा लाडका,
अतुल

Asha Transcription

Check Also

school letter writing marathi

शाळेच्या वार्षिक संमेलनात पारितोषिक मिळवल्या बद्दल वडिलांना वर्णन पत्र.

School Letter Writing Marathi दिनांक :-२० सप्टेंबर २०१८ कांदिवली पूर्व, मुंबई तीर्थरूप बाबांस, चि . …

One comment

  1. Pingback: w88.com

Leave a Reply