तुमच्या मित्राला / मैत्रिणीला पत्र पाठवून वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या

अतुल रामदास मोरे
विलास बंगला, शास्त्री नगर,
रत्नागिरी – ४१५६०५
दि. १५/४/२०१८.

प्रिय निलेश,

वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा!

निलेश २५ जूनला तुझा वाढदिवस आहे. पण माझ्या शाळेची सहल याच दरम्यान चिपळूणला जाणार आहे. त्यामुळे मी नाशिकला येऊ शकणार नाही. माझी तुझ्या वाढदिवसाला यायची खूप इच्छा होती. पण सहलीमुळे मी येऊ शकत नाही. मे महिन्याच्या सुट्टीत मी तिकडे येईल , मग आपण खूप मज्जा करु.

तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी माझ्या सगळ्या मित्रांना चॉकलेटस देईन व तुझा वाढदिवस साजरा करीन.

पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.

तुझा मित्र,
अतुल

Advertisement

Check Also

school letter writing marathi

शाळेच्या वार्षिक संमेलनात पारितोषिक मिळवल्या बद्दल वडिलांना वर्णन पत्र.

School Letter Writing Marathi दिनांक :-२० सप्टेंबर २०१८ कांदिवली पूर्व, मुंबई तीर्थरूप बाबांस, चि . …

Leave a Reply