Asha Transcription

तुमच्या शाळेची सहलीला जाण्याची परवानगी मागणारे पत्र बाबांना लिहा

दिनांक :-२० सप्टेंबर २०१८

कांदिवली पूर्व
मुंबई

तीर्थरूप बाबांस
चि . मनालीचा शिरसाष्टांग नमस्कार,

तुम्हाला मुद्दाम पत्र लिहिण्यास कारण की ह्या वर्षी दिवाळीच्या सुट्टीत आमच्या शाळेची सहल नाशिक येथे जाणार आहे. आमचे वर्गशिक्षक साठे सर या सहलीचे प्रमुख आहेत त्यामुळे मला जाण्याचा कार उत्साह वाटतो आहे .सहलीला आम्ही पंचवटी, सप्तशृंगी ,त्रिंबकेश्वर ,पांडवलेणी हि सारी ठिकाणे पाहणार आहोत.आई मला म्हणाली की बाबांची परवानगी घेऊन जा म्हणून हे पत्र मी तुम्हाला लिहित आहे.तुम्ही मला जायला नाही म्हणणार नाही ह्याची खात्री असल्याने मी आधीच नाव देऊन टाकले आहे. सहलीची फी 15०० रूपये आहेबाबा, मी जाऊ ना? लवकर कळवावे.

तुमची लाडकी मुलगी
8 / 13

Asha Transcription

About admin

Check Also

Independence day speech in marathi

Independence day speech in marathi independence day essay in marathi   सर्वप्रथम, सन्माननीय प्रमुख अतिथी …

Leave a Reply

Your email address will not be published.