Amazon Big Sell

तुमच्या शाळेत होणाऱ्या स्पर्धची माहिती देणारे वडिलांना पत्र लिहा.

साक्षी मदन केदार,
श्रीराम विद्यालय,
पंचवटी, नाशिक – ४२२००५
दि. २५/८/२०१८.

तीर्थरूप बाबांना,
शि. सा. नमस्कार.

बाबा तुमचे पत्र मिळाले. वाचून आनंद झाला. मी आता तुम्हाला आमच्या शाळेत होणाऱ्या स्पर्धची माहिती सांगण्यासाठी हे पत्र पाठवत आहे. आमच्या शाळेत वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा होणार आहेत. तुम्हाला माहितच आहे, मला चित्रकलेची खूप आवड आहे, त्यामुळे मी चित्रकला स्पर्धत सहभाग घेतला आहे. त्याचबरोबर माझ्या वर्गशिक्षकांनी माझे नाव वक्तृत्व स्पर्धा आणि गायन स्पर्धेसाठी माझे नाव सुचवले आहे. बाबा मी सगळ्या स्पर्धांची मनापासून तयारी करत आहे. बाबा माझे गाणे छान तयार झाले आहे. मी सुट्टीत घरी आल्यावर तुम्हाला गाऊन दाखवीन.

तसेच चित्रकलेत ज्याला पारितोषिक मिळणार आहे, त्याचे चित्र शाळेच्या वार्षिक मासिकाच्या मुखपृष्ठावर छापणार आहे, त्यामळे मी त्याची जय्यद तयारी सुरु केली आहे. तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहे, हे मला माहीतच आहे. निकाल मी तुम्हाला पत्राने कळवेन.

तुमची लाडकी,
साक्षी

Advertisement

Asha Transcription

Check Also

school letter writing marathi

शाळेच्या वार्षिक संमेलनात पारितोषिक मिळवल्या बद्दल वडिलांना वर्णन पत्र.

School Letter Writing Marathi दिनांक :-२० सप्टेंबर २०१८ कांदिवली पूर्व, मुंबई तीर्थरूप बाबांस, चि . …

3 comments

  1. Pingback: GPS navigaciju remontas

  2. Pingback: inj mana jani baha

  3. Pingback: Klik hier

Leave a Reply