Amazon Big Sell

तुमच्या हातून घडलेल्या चुकीबद्दल माफी मागणारे पत्र तुमच्या वर्गशिक्षकांना लिहा

कु. योगेश जोग,
इयत्ता ७ वी / ब
श्रीराम विद्यालय
पंचवटी, नाशिक – ४२२००४
दि . ८ जुलै २०१८

प्रति,
माननीय वर्गशिक्षक,
इयत्ता ७ वी / ब
श्रीराम विद्यालय
पंचवटी, नाशिक – ४२२००४

महोदय,
सादर प्रणाम,

मी आपल्या वर्गात शिकणारा एक विद्यार्थी आहे. काल वर्गात झालेल्या प्रकाराबद्दल आमच्या ग्रुपकडून माफी मागण्यासाठी मी हे पत्र लिहीत आहे. काल वर्गात आमच्या दोन ग्रुपमध्ये वादावादी झाली. पण त्यात आमची काहीही चुकी नाही. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत त्या मुलांनी आमचा डब्बा खाली सांडला. त्यावरून हा वाद झाला. दुसऱ्या ग्रुपमधील मुले आम्हाला चिडवत होती. हा त्यांचा चिडवण्याचा प्रकार सुट्टी संपल्यानंतरही चालूच होता. आणि नेमक्या तुम्ही आल्या तेंव्हा आम्हीच वाद करतांना दिसलो.

तरी आम्हाला असे वाटते की सुट्टी संपल्यानंतर हा वाद संपायला हवा होता. त्यामुळे आमच्या ग्रुपच्या वतीने मी आमच्या हातून घडलेल्या चुकीबद्दल माफी मागत आहोत. यापुढे अशी चूक होणार नाही याची मी हमी देतो. कृपया क्षमा असावी.

आपला नम्र,
कु. योगेश जोग

Advertisement

Asha Transcription

Check Also

school letter writing marathi

शाळेच्या वार्षिक संमेलनात पारितोषिक मिळवल्या बद्दल वडिलांना वर्णन पत्र.

School Letter Writing Marathi दिनांक :-२० सप्टेंबर २०१८ कांदिवली पूर्व, मुंबई तीर्थरूप बाबांस, चि . …

Leave a Reply