दिवाळी कशी साजरी केली याचे वर्णनात्मक पत्र मित्र / मैत्रिणीला लिहा.

रोहिणी उमेश कुमावत,
४७, गजानन चौक, पंचवटी,
नाशिक – ४२२००५
दि. २६/४/२०१८.

प्रिय योगिता,
सप्रेम नमस्कार.

नुकतीच दिवाळी झाली. आमची दिवाळी खूप छान साजरी झाली. दिवाळीच्या दिवसांत आमच्या घरी खूप धामधूम असते. आम्ही घर सजवायला दारावर तोरण बांधले . मी आणी ताईने मिळून घरीच कंदील केले. लाडू, करंज्या , चिवडा , चकल्या असे वेगवेगळे पदार्थ आईने बनवले. त्यावेळी तिला आम्हीही मदत केली. आईबाबांनी दिवाळीला आम्हांला नवीन कपडे घेतले. दिवाळीसाठी आम्हीही सर्वासाठी काही नवीन वस्तू खरेदी केल्या. आईला नवीन सोन्याचे मंगळसूत्र खरेदी केले.

दिवाळीच्या दिवसांमध्ये आम्ही दारात वेगवेळ्या रंगांच्या रांगोळ्या काढल्या आणि येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत केले. संध्याकाळी लक्ष्मीची पूजा केली. आम्ही खूप फटाकेही फोडले. भाऊबिजेला मी आणि ताईने दादाला ओवाळले. त्याने आम्हाला छान भेटवस्तू दिल्या.

मी तुझ्यासाठी छान भेटवस्तू घेतली आहे. तू मामाच्या गावावरून आल्यावर मी तुला ती देईल.

तुझी मैत्रीण,
रोहिणी

Check Also

new year wishing letter marathi

नवीन वर्षाच्या शुभेच्छा पाठविण्यासाठी पत्र

दिनांक १५.१२.२०१८ २०४, प्रिंस हाउस, मुंबई आदरणीय काका, सप्रेम नमस्कार, तुम्हाला नव वर्षाच्या खुप खुप …

letter writing marathi

परिक्षतेत अपयशी झाल्यावर मित्राला सहानभूती पत्र

दिनांक १६.१२.२०१८ माझ्या प्रिय मित्रा, मला तुझ्या परीक्षे मध्ये झालेल्या अपयशाबद्दल मिळलेल्या माहितीमुळे खूप दुःख …

उन्हाळ्याच्या सुट्टीतील अनुभव पत्राद्वारे सांगणे

दिनांक ०१.०५.२०१९ शांती निवास, दापोली, आदरणीय काका , साष्टांग नमस्कार, मी येथे मज्जेत आणि आंनदी …

आपल्या हॉस्टेल विषयी माहिती सांगणारे आईला पत्र

दिनांक १८.१२.२०१८ प्रिय आईस, साष्टांग नमस्कार माझा विश्वास आहे की तुम्ही सर्व खुशाल असाल. मी …

Leave a Reply

error: माफ करा ही माहिती कॉपीराइट प्रोटेक्टेड आहे..