Amazon Big Sell

देवगड

प्राचीन कालखंडापासून देवगड हे महत्वाचे बंदर म्हणून ओळखले जाते. किल्ल्याच्या बांधकामाच्या कालखंडाविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. छत्रपती शिवरायांनी गडाजवळच्या खाडीमध्ये तारवे बांधल्याचा पुरावा उपलब्ध आहे.

किल्ल्यावरील तटबंदी आणि बुरुज आजही मजबूत अवस्थेत उभे आहेत. तटबंदीवरून आजूबाजूच्या समुद्राचे विहंगम दृश्‍य दिसते. किल्ल्यावर पुरातन वाड्यांचे अवशेष आणि सुस्थितीत असलेला दरवाजा तसेच पुरातन गणपती मंदिर आहे.

किल्ल्याच्या तटबंदीवरून गडाची फेरी मारता येते.तटबंदीवरून सागराचे अथांग असे दर्शन होते. तटबंदीजवळ दिपगृह आहे.
भरतगड किल्ल्याचे बांधकाम सावंतवाडीकर फोंड सावंत यांनी इ.स. १६८० मध्ये केली.वाडीकर फोंड सावंत यांनी किल्ल्यावर पाणी लागल्यानंतर किल्ल्याची बांधणी केली.पुढे तुळाजी आंग्रे यांनी भरतगड किल्ला जिंकला.पुढे इ.स.१८१८ मध्ये इंग्रजांच्या ताब्यात किल्ला गेला.

भरतगडाचे दार भग्नावस्थेत आहे. तटबंदीची सुद्धा खूप प्रमाणात पडझड झालेली आहे. गडावर घनदाट वनराई आहे. गडावर मुख्यत: काजू व आंब्याच्या बागा आढळतात.

भरतगडावर २०० फूट खोल विहीर आहे.या विहीरीच्या तळाशी असलेल्या गुप्त दरवाजातून थेट सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाता येते. भरतगडाचे वैशिट्य म्हणजे गडावर मंदीर आणि मशीद शेजारी आहे.गड पाहावयास एक तास पुरेसा आहे.

Asha Transcription

About admin

Check Also

किल्ले रोहिडेश्वर

सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक सुरेख डोंगरमार्ग आहे. या डोंगररांगेत ३ ते ४ …

Leave a Reply

Your email address will not be published.