देशांतर्गत सुरक्षासंबंधी मोहिमेत धारातिर्थी पडलेल्या जवानांच्या विधवा/अवलंबितांना आर्थिक मदत

अ.क्र. योजना सविस्तर माहिती
योजनेचे नाव : देशांतर्गत सुरक्षासंबंधी मोहिमेत धारातिर्थी पडलेल्या जवानांच्या विधवा/अवलंबितांना आर्थिक मदत
योजने बद्दलचा शासन निर्णय :
 • अ) शा.नि.क्र.- संकीर्ण-1096/3330/प्र.क्र.220/96/28 दि. 30.03.1999.
 • ब) शा.नि.क्र.- मासैम-1099/1661/प्र.क्र.126/99/28 दि. 14.07.1999.
 • क) शा.नि.क्र.- मासैम-1099/1661/प्र.क्र.126/99/28 दि. 04.10.2000.
 • ड) शा.नि.क्र.- मासैक-2002/933/प्र.क्र.86/2002/28 दि. 09.12.2003
योजनेचा प्रकार : युध्दात / युध्दजन्य मोहिमेत , देशांतर्गत सुरक्षासंबंधी मोहिमेत / चकमकीत धारातिर्थी पडलेल्या/अपंगत्व आलेल्या सैन्यदलातील तसेच सीमा सुरक्षा बल व इतर तत्सम निमलष्कर दलातील महाराष्ट्रातील अधिकारी/जवान यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत.
योजनेचा उद्देश : युध्दात / युध्दजन्य मोहिमेत तसेच देशांतर्गत निर्माण होणाऱ्या ताणतणाव, दहशतवाद/आतंकवाद इ. दृष्ट प्रवृत्तीबरोबर मुकाबला करतांना मृत्यु पावलेल्या महाराष्ट्रातील कायम रहिवासी असलेल्या सैन्यदलातील तसेच सीमा सुरक्षा बल व इतर तत्सम निमलष्कर दलातील अधिकारी/जवान यांच्या कुटुंबियांवर कोसळलेल्या त्या शहीद अधिकारी/जवान यांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत देणे तसेच अपंगत्व प्राप्त झालेल्या जवानांना / सैनिकांना आर्थिक मदत देणे.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सैन्यदलातील तसेच सीमा सुरक्षा बल व इतर तत्सम निमलष्कर दलातील महाराष्ट्रातील अधिकारी / जवान.
योजनेच्या प्रमुख अटी : वरील शासन निर्णयानुसार.
आवश्यक कागदपत्रे :
 • शहीद झालेल्या जवान/अधिकारी यांचे विधवा/अवलंबित तसेच अपंगत्व प्राप्त झालेल्या जवान/अधिकारी यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळण्यासाठी खालील कागदपत्राची आवश्यकता आहे :-
 • (अ) महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचे कागदोपत्री पुरावा/प्रमाणपत्रे .
 • (ब) शहीद/अपंगत्व प्राप्त झालेल्या लाभार्थीचे जन्म दिनांकांचे प्रमाणपत्र
 • (क) राहण्यचा पत्ता व त्या ठिकाणी केव्हापासून राहत आहे त्याचा पुरावा
 • (ड) युध्दजन्य कारणामुळे शहीद/अपंगत्व प्राप्त झालेल्या जवान/ अधिकारी यांचा अभिलेख कार्यालयाचा पुरावा.
 • (इ) शहीद होण्याचा /अपंगत्व प्राप्त होण्याचा दिनांक ,ठिकाण व मोहिम याबाबत युनिट/अभिलेख कार्यालयाचे पत्र
 • (ई) शहीद जवान प्रकरणी अभिलेख कार्यालयात नमूद अवलंबिताचे नांव व नाते
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
 • अ) शहीद जवानाच्या विधवा/अवलंबितांना एकवेळची आर्थिक मदत रु.5 लाख
 • ब) अधिकारी/जवान यांना त्यांचे अपंगत्वाचे प्रमाण 20 टक्के ते 49 टक्कयापर्यंत असेल तर रु. 1 लाख आणि अपंगत्वाचे प्रमाण 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास रु. 3 लाख.
अर्ज करण्याची पद्धत : वरील अ.क्र. 7 मध्ये नमूद केलेली कागदपत्र लाभार्थीच्या जिल्हयातील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करणे.
१० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : संबंधित लाभार्थीने कागदपत्राची पुर्तता केल्यानंतर संबंधित लाभार्थीचे प्रकरण जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचेकडून विभागास सादर केले जाते व त्यावर मा. संचालकाची शिफारस करुन मंजुरीकरीता शासनाकडे सामान्य प्रशासन विभाग (कार्यासन-28) सादर केले जाते आणि त्यास शासनाकडून मंजूरी दिली जाते. प्रकरण मंजूर होण्यास अंदाजे 3 महिने लागतात.
११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय
१२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ अ्द्याप सुरू करण्यात आलेले नाही.
अ.क्र. योजना सविस्तर माहिती
योजनेचे नाव : शौर्यासाठी पारितोषिके

 • अ) बक्षिसे
 • ब) निवृत्तीवेतनविषयक खर्च
योजने बद्दलचा शासन निर्णय :
 • अ) शा.नि.क्र. :- मगौपु-1089/सीआर-22/89/भाग-2/29-अ दि. 16.11.90 व दि. 20.11.90.
 • ब) शा.नि.क्र. :- शौपपु-2000/303/प्र.क्र.31(2000)/28 दि. 03.07.2000.
 • क) शा.नि.क्र. :- सैकवि-1099/611/प्र.क्र.58/99/28 दि. 08.02.2002.
 • ड) शा.नि.क्र. :- शौपपु-2001/2898/प्र.क्र.16(2002)/28 दि. 16.08.2002.
 • इ) शा.नि.क्र. :- शैापपु-2008/प्र.क्र.49/28 दिनांक 07 मे 2011.
योजनेचा प्रकार : महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असलेल्या भारताच्या सैन्य दलातील शौर्य/सेवा पदक धारकांना किंवा पदकधारकांच्या वारसदारांना रोख रक्कम व व्हिक्टोरिया क्रॉस/शौर्य पदक धारकांच्या अवलंबित विधवांना मासिक अनुदान
योजनेचा उद्देश :
 • (अ) शौर्यासाठी पारितोषिके. भारतीय सेनेतील ज्या अधिकारी व जवान यांनी सैन्यामध्ये केलेल्या विशेष शौर्याबद्दल मा. राष्ट्रपती यांच्याकडून देण्यात येणारी “विशेष दर्जाची शौर्य पदके” मिळालेली असतील अशा अधिकारी/जवान यांचे मनोबल उंचविण्यासाठी महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेखाली रोख रक्कम देण्याची योजना आहे
 • (ब) निवृत्ती वेतन. भारतीय सेनेतील ज्या अधिकारी/ जवान यांचा मरणोत्तर शौर्य पदक (Gallantry Award) देऊन गौरव करण्यात आलेला असेल अशा विजेत्यांवर अवलंबून असणाऱ्या विधवा /अवलंबित यांना ( प्रत्येक शौर्य पदकानुसार निरनिराळे ) मासिक अनुदान.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : मा. राष्ट्रपती यांच्याकडून “विशेष दर्जाची शौर्य /सेवा पदके” मिळालेली असतील असे अधिकारी/जवान, व जर ही पदके मरणोत्तर प्रदान करण्यात आली असतील तर त्यांच्या विधवा / अवलंबित.
योजनेच्या प्रमुख अटी : वरील शासन निर्णयानुसार.
आवश्यक कागदपत्रे :
 • (अ) शौर्यासाठी पारितोषिके. :-
 • केंद्र शासनाकडून शौर्य/सेवा पदक प्राप्त झालेल्या अधिकारी/जवान यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळण्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे :-
 • (अ) महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा कागदोपत्री पुरावा/प्रमाणपत्रे.
 • (ब) शौर्य/सेवा पदक प्राप्त झालेल्या लाभार्थीचे जन्म दिनांकाचे प्रमाणपत्र.
 • (क) महाराष्ट्रात राहण्यचा पत्ता व त्या ठिकाणी केव्हापासून राहत आहे तो दिनांक
 • (ड) शौर्य/सेवा पदक प्राप्त झालेल्या जवान/अधिकारी यांची Gazette Notifaction ची सेना मुख्यालय प्रत.
 • (इ) शौर्य/सेवा पदक प्राप्त जवानांनी महाराष्ट्रात दहावी/बारावी पर्यंत शिक्षण घेतल्याबाबतचे प्रमाणपत्र.
 • (ब) निवृत्ती वेतन.:-
 • शौर्य पदक धारकांच्या विधवांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजने अंतर्गत मासीक अनुदान मिळण्यासाठी खालील कागदपत्रांचीआवश्यकता आहे :-
 • (अ) शौर्य पदक प्राप्त झालेल्या अधिकाऱ्याकडील सैन्यातील पूरावा
 • (ब) शौर्यपदक धारकाची अवलंबित असल्याबाबतचा कागदोपत्री पुरावा
 • (क) महाराष्ट्रात राहण्यचा पत्ता व त्या ठिकाणी केव्हापासून राहत आहे तो दिनांक.
 • (ड) शौर्य पदक प्राप्त झालेल्या जवान/अधिकारी यांची Gazette Notifaction ची सेना मुख्यालय यांचेकडून प्राप्त झालेली माहिती.
 • (इ) शौर्य पदक धारक हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असल्याचा कागदोपत्री पुरावा.
 • (ई) शौर्य पदकाचे मासिक अनुदान मिळण्याबाबतचा अर्ज.
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
 • (अ) शौर्यासाठी पारितोषिके. :- महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेखाली पुरस्कार रोख रक्कम देण्याची योजना आहे. दि. 01.05.2011 पासून पदकनिहाय रु. 34,000/- ते रु. 25,00,000/- रोख रक्कम देण्यात येत आहे.
 • (ब) निवृत्ती वेतन. :- शौर्यपदक धारकांवर अवलंबून असणाऱ्या विधवांना पदकनिहाय मासीक अनुदान रु. 1000/- ते रु. 12,500/- दि. 01.05.2011 पासून देण्यात येत आहे.
अर्ज करण्याची पद्धत : वरील अ.क्र. 7 मध्ये नमूद केलेली कागदपत्र लाभार्थीच्या जिल्हयातील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करणे.
१० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
 • (अ) शौर्यासाठी पारितोषिके. :- शौर्य/सेवा पदक धारकांने कागदपत्राची पुर्तता केल्यानंतर संबंधित लाभार्थीचे प्रकरण जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचेकडून विभागास सादर केले जाते व त्यावर मा. संचालकाची शिफारस करुन मंजुरीकरीता शासनाकडे (कार्यासन-28) सादर केले जाते आणि त्यास शासनाकडून मंजूरी दिली जाते. प्रकरण मंजूर होण्यास अंदाजे 2 ते 3 महिने लागतात.
 • (ब) निवृत्ती वेतन. शौर्य पदक धारकांच्या विधवा/अवलंबित यांनी कागदपत्राची पुर्तता केल्यानंतर संबंधित लाभार्थीचे प्रकरण जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांची मंजूरी मिळाल्यानंतर अनुदानाची मागणी विभागास केली जाते व त्यास मंजूरी दिली जाते. प्रकरण मंजूर होण्यास अंदाजे 15 ते 30 दिवस लागतात.
११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय
१२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ अ्द्याप सुरू करण्यात आलेले नाही

Check Also

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव …

Leave a Reply